Type to search

धुळे

सव्वालाख वृक्षारोपणासाठी प्रशासन सज्ज

Share

धुळे । प्रतिनिधी :  शासनाकडून वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत तब्बल एक लाख 26 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ कमी वेळात अधिक खड्डे खोदण्यासाठी कर्मचार्‍यांना पोखर यंत्र हताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे़ या यंत्राव्दारे दोन मिनिटाला एक खड्डा खोदला जाणार आहे़.

वृक्षलागवडीसाठी शहरातील प्रत्येक प्रभागाला उद्दिष्ट दिले जाणार असून रोपे देखील पुरविली जाणार आहेत़ शिवाय लागवड झालेल्या वृक्षांचे जिओ टॅग फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केले जाणार आहेत़ प्रत्येक प्रभागाला जागेच्या उपलब्धतेनुसार वृक्षांचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यानुसारच रोपांचे वितरण होणार केले जाणार आहे़

वृक्षलागवडीची मोहिम केवळ शहरातच नव्हे तर जिल्हाभरात राबविली जाणार असल्याने या मोहिमेचा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आढावा घेतला आहे़ त्यानुसार वनविभागाकडे आधीच रोपांची मागणी नोंदविण्यात आली असल्याचे मनपातर्फे स्पष्ट करण्यात आले़

शासनाने येत्या जुलै महिन्यात राबविण्यात येणार्‍या वृक्ष लागवड मोहिमेसाठी मनपाला तब्बल एक लाख 26 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे़ टॉवर बगीचा, पांझरा जल केंद्राच्या आवारात, महापालिकेच्या जागा, आरोग्य केंद्र, मनपा क्षेत्रातील सर्व 19 प्रभाग शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाण, अमरधाम, हद्दवाढ क्षेत्रातील अवधान, वरखेडी, चितोड, नकाणे, बाळापुर, प्रिंपी, महिंदळे आदी ठिकाणी नियोजन केले आहे़

शासनाने येत्या जुलै महिन्यात राबविण्यात येणाजया वृक्ष लागवड मोहिमेव्दारे शहरातील एकूण 249 जागांवर वृक्षलागवडीचे नियोजन आहे़वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत 60 हजार वृक्षांची लागवड मनपा कर्मचार्‍यांकडून केली जाणार आहे़ तर उर्वरित वृक्षांची लागवड लोकसहभागाव्दारे होणार आहे़ त्यासाठी 30 जूनपर्यत 60 हजार खड्डे पोखर यंत्राव्दारे खोदण्यात येणार आहे़

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!