Type to search

धुळे

हरण्यामाळ तलावातून पाटचारीद्वारे नकाणे भरण्यास सुरुवात

Share

धुळे ।  प्रतिनिधी :  शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य स्त्रोत आलेला नकाणे तलावात हरण्यामाळ तलावातून 40 दलघफु पाणी सोडण्यात येत आहे़ सद्यःस्थितीत 15 दलघफु पाणी नकाणे तलावात जमा झाले आहे़.

शहरातील सुमारे एक ते सव्वा लाख लोकवस्तीला नकाणे तलावातून पाणीपुरवठा केला जातो़ नकाणे तलावातून हनुमान टेकडी, सिमेंट जलकुंभ, रामनगर, कुमारनगर, अशोकनगर आदी जलकुंभाव्दारे पाणीपुरवठा केला जातो़

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सर्वच जलस्त्रोताची पाण्याची पातळी खालवली आहे. नकाणे तलावातील जलसाठ्यातील जलसाठा कमी झाल्याने पाणी वितरण विस्कळीतझाल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहे़ पावसाचे उशिराने आगमन होत आहे. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्यात पाण्याचे नियोजन करण्यासाठी मनपाकडून उपाययोजना म्हणून व हरण्यामाळ तलावातून नकाणे तलाव भरण्यासाठी सुरूवात झाली आहे़.

सद्यःस्थितीत 15 दलघफु जलसाठा नकाणे तलावात झाला आहे़ हरण्यामाळ तलावातील 40 दलघफुपर्यतच्या जलसाठ्यातून जुनपर्यत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ याबाबत महापौर चंद्रकांत सोनार, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी तलावाची पाहणी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!