जुनवणेत पिसाळलेल्या कुत्र्याचा 27 जणांना चावा

0
धुळे । तालुक्यातील जुनवणे गावासह परिसरात आज पहाटे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. घराबाहेर झोपलेल्या लोकांच्या अंगावर धावून जावून चावा घेतला. त्यात 27 जण जखमी झालेत. त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेमुळे गावात घबराट पसरली आहे.

जुनवणे गावात आज पहाटे 2 ते सकाळी 5 वाजेदरम्यान एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. गावात अंगणात ओट्यावर झोलेल्या लोकांना चावा घेत पळत सुटला. त्यामुळे घाबरुन जागे झालेल्या लोकांनी कुत्र्याला पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्रा ग्रामस्थांच्या अंगावर येवून चावा घेतला.

काही तरुणांनी लाठ्या काठ्यांनी कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न केला. पिसाळलेले कुत्रे गल्ली बोळातून पळत सुटले. कुत्र्याच्या हल्ल्यात महिला, पुरुषांसह काही बालकेही जखमी झाले. जखमींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये राकेश निकम, राहुल पाटील, केवळबाई चित्तेवान, आधार पाटील,

विजय पाटोळे, यशवंत पाटील, विजय पाटील, रतन पाटील, विलास पाटील, मेघना जगदाळे, दीपक गोसावी, हर्षल शिंदे, राहुल ब्राह्मणे, आशा मराठे, संदीप पाटोळे, दिनेश पाटोळे, चंद्रकांत गव्हाण, प्रल्हाद वाघ, सविता बागुल, ललिता शिंदे, मनोहर खैरनार, राजेंद्र पाटील, सीताबाई मोरे सर्व (रा. जुनवणे व वाघाडी) यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*