विद्यार्थ्यांना घोडेस्वारीबाबत मार्गदर्शन

0
शिरपूर । प्रतिनिधी । शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित अमरिशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूलमध्ये या वर्षी सुरु होत असलेल्या हॉर्स रायडींग समर कँम्प मुकेश पटेल रायडींग अकॅडमी अंतर्गत घोडेस्वारी प्रशिक्षण या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

लवकरच या प्रशिक्षणास तांडे येथील भव्य मैदानावर प्रारंभ करण्यात येत आहे. एस.व्ही.के.एम संचलित मुकेशभाई आर.पटेल सी.बी.एस.ई. स्कूल, तांडे येथील घोडेस्वारी प्रशिक्षण व्यवस्थापक गौरंग त्रिपाठी व घोडेस्वारी प्रशिक्षक युसुम शेख यांनी मुकेश पटेल रायडींग अकॅडमी विषयी माहिती दिली. प्राचार्य निश्चल नायर यांनी गौरंग त्रिपाठी व युसूम शेख यांचे धन्यवाद पत्र देऊन आभार व्यक्त केले.

कार्यक्रमात गौरंग त्रिपाठी व घोडेस्वारी प्रशिक्षक युसुम शेख यांनी विद्यार्थ्यांच्या मनात घोडेस्वारीबाबत निर्माण होणार्‍या विविध शंकांचे निरसन केले. घोडेस्वारी प्रशिक्षणात येणार्‍या विविध बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यांनी सांगितले की, घोडेस्वारीचे महत्व ऐतिहासिक काळापासून आहे. घोडेस्वारी केल्याने आपल्या मध्ये आत्मविश्वास तसेच एकाग्रता, चाणाक्ष बुद्धिमत्ता निर्माण होते.

घोडेस्वारीला शालेय स्तरावर महत्वपूर्ण क्रीडाप्रकार आहे. घोडेस्वारी फक्त भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशात प्रसिद्ध असा खेळ प्रकार आहे. घोडेस्वारीचे महत्व दिवसेंदिवस सर्वत्र वाढत चालले आहे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने मुकेश पटेल रायडींग अ‍ॅकेडमीमध्ये सहभागी होऊन घोडेस्वारी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश चोपडे, सूत्रसंचालन उपशिक्षिका आभेरी बोस यांनी केले.

LEAVE A REPLY

*