Type to search

maharashtra धुळे

मुकटी येथे पाणीटंचाई : शिवसेनेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा

Share

मुकटी ।  वार्ताहर :  धुळे तालुक्यातील मुकटी येथे तीव्र पाणीटंचाई असून शिवसेनेतर्फे पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिला असून टँकरवर पाणी भरण्यासाठी गर्दी होत आहे.

मुकटी येथे तिव्र पाणीटंचाई असून जनावरांना देखील पाणी मिळत नाही,शेतकरी पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. या पार्श्वभूमीवर गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी येथे टँकरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठी युवासेना शाखायुवाधिकारी मनोहर पाटील हे गावात पाणी वितरण करीत आहेत,

त्यांना उपतालुका प्रमुख दिलीप भाऊसाहेब, एन.डी. पाटील, शिवसेना शाखाप्रमुख प्रवीण साळुंके, मुकेश मैन, कल्पेश पाटील, प्रदीप साळुंके यांचे सहकार्य लाभत आहे. पाणी टंचाईच्या काळात शिवसेनेच्या विधायक उपक्रमाने ग्रामस्थांची पाण्याची सोय झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!