Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच धुळे

जळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज

Share

पुणे । वृत्तसंस्था :  तापमानवाढीमुळे राज्यात सरासरीच्या 95 टक्के पाऊस होण्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला. जळगाव, धुळ्यासह अनेक ठिकाणी जून आणि जुलै महिन्यांत पावसाचा खंड पडण्याची शक्यता असून ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल. शेतकर्‍यांनी कमी कालावधी आणि कमी पाणी लागेल, अशी पिके घेणे योग्य ठरेल, असा सल्ला साबळे यांनी दिला.

कमाल तापमान, सकाळ आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता, वार्‍याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर आधारित हा अंदाज आहे. त्यानुसार राज्यात सरासरीच्या 95 टक्के पाऊस होण्याची शक्यता असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले. वार्‍याचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जळगाव, धुळे, पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, निफाड, अकोला आणि परभणी येथे पावसात मोठे खंड पडतील, असे साबळे यांनी सांगितले.

ही पिके लावावीत!

मूग, मटकी, उडीद, तूर, मका, सोयाबीन ही पीके घ्यावीत. कापूस लागवडीचे क्षेत्र कमी करणे गरजेचे आहे. ठिंबकचा वापर करावा.

धूळपेरणी नकोच!

धूळपेरणी उपयोगाची नाही. 65 मिलीमीटर पावसाचा जमिनीत ओलावा निर्माण झाल्याशिवाय शेतकर्‍यांनी पेरणी करु नये.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!