#Video # धुळ्यात भाजपाचे रस्त्यातील खड्ड्यांविरोधात आंदोलन

0

धुळे । प्रतिनिधी : राज्यातील सर्व रस्त्यांनी खड्डेमय झालेले आहेत. खड्डे दूरूस्त करण्यासाठी नगरपालिका, महापालिकांकडे निधी नाही. केंद्रात, राज्यात भाजपाची सत्ता असतांना रस्त्यातील खड्डे दूरूस्त करण्याकडे लक्ष देण्यात येत नाही. असे असतानाही धुळ्यात भाजपाच्या पेठ विभागाच्या वतीने आज खड्डे दूरूस्तीसाठी अनोखे आंदोलन करण्यात आले.

मनपाने केले दूर्लक्ष

धुळे महापालिकेत भाजपा विरोधी पक्षात आहे. शहरातील रस्त्याच्या खड्डे दूरूस्तीसाठी भाजपाच्या पेठ विभागातर्फे अनेक निवेदने देण्यात आलीत. परंतू मनपा प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. आता दोनदिवसावर गणेशोत्सव येवून ठेपला असतांनाही खड्ड्यांच्या दूरूस्तीचे काम सुरू करण्यात आलेले नाही.

त्यामुळे आज भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले.
यावेळी जितेंद्र धात्रक, शिरीष शर्मा, तुषार भागवत, सागर कोंडगीर, विजय गवळी, स्वप्नील कुलकर्णी, सागर लाड, मंगलाताई कवडीवाले, मुनाफ अन्सारी, अनिल खोपडे, प्रविण मराठे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*