आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलतर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण

0
शिरपूर । दि.7 । प्रतिनिधी-शिरपूर शहरातील वाल्मिकनगर येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले असून वृक्षदिंडी व वृक्षारोपण देखील करण्यात आले.
न.पा. बांधकाम सभापती सौ. संगिता देवरे, रत्नप्रभा सोनार, शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती जाधव यांच्या हस्ते सोमवार दि. 3 जुलै रोजी सकाळी शालेय परिसरात परिसरात वेगवेगळया प्रकारची रोपे लावण्यात आली.

यावेळी सौ. संगिता देवरे यांनी आपल्या मनोगतातून वृक्षदिंडीचे कौतुक करुन वृक्षारोपणासह वृक्ष संवर्धनाची गरज स्पष्ट केली.

कार्यक्रमास वाल्मिकनगर शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती जाधव, गुरुदत्त कॉलनी येथील शाळेचे मुख्याध्यापक आर.टी.भोई, सुभाष कॉलनी शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र परदेशी आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन ए.बी.पाटील यांनी केले. आभार स्वाती जगदाळे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती जाधव यांच्यासह दिपक पवार, ए.बी.पाटील, सौ. ढिवरे, शितल पाटील, स्वाती जगदाळे, श्री शिरसाठ, श्री जाधव यांचे सहकार्य लाभले.

खर्दे बु. येथे वृक्षारोपण
शिरपूर तालुक्यातील खर्दे बु. येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत पंचायत समिती सदस्या सौ. रंजनाबाई गुजर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

शाळेच्या प्रांगणात व परिसरात सिसम, आवळा, चिंच अशी रोपे लावण्यात आले. शाळेच्या पटांगणावर पंचवीस झाडे लावण्यात आली असून यापूर्वीच शाळेच्या पटांगणावर मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेल्या वृक्षांनी महाकाय आकार घेतला आहे.

वृक्षारोपणापूर्वी गावात वाजत गाजत वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृतीपर घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांकडे अनेक संदेश फलक होते. यावेळी विद्यार्थ्यांनी झाडे जगविण्याची शपथ घेतली.

पंचायत समितीच्या सदस्य रंजना गुजर, सरपंच भरत गुजर, उपसरपंच प्रकाश गुजर, मुख्याध्यापक प्रदीप गहीवरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुशिला मराठे, प्रशांत चौधरी, छाया पाटील, जितेंद्र करंके, दिलीप पावरा, शरद पाटील आदींनी परीश्रम घेतले.

भोरखेडा येथे वृक्षारोपण
शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील आर.सी.पटेल मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी, शिक्षक व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते शालेय आवारात मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवलसिंग महादू वंजारी, उपाध्यक्ष रघुनाथ भिलेसिंह राजपूत, मुख्याध्यापक एन.सी.पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमास मुख्याध्यापक एन.सी.पवार, पर्यवेक्षक पी.आर.साळुंके, ए.ए.चौधरी, के.आर.पावरा, पी.एस.परदेशी, एस.बी.पाटील, एस.पी.वाघ, एस.एच.निकुंभे, एस.पी.करोडे, डी.व्ही.ठाकरे, एस.जी.पवार, आर.डी.ठाकरे, श्रीमती भारती मोरे, भाग्यश्री पाटील, सोनाली पाटील आदींसह ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

पटेल कला महाविद्यालयात वृक्षारोपण
येथील आर.सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व राष्टीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर.पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या वृक्ष लागवड कार्यक्रमास प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील, उपप्राचार्य डॉ.ए.जी.सोनवणे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे उ.म.वि. विभागीय समन्वयक प्रा.आर.पी.महाजन, कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.जे.माहेश्वरी, उप कार्यक्रम अधिकारी प्रा.दिपक चव्हाण, रा.से.यो. स्वयंसेवक कल्याण महाजन, दुर्गेश माळी व सर्व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

 

 

LEAVE A REPLY

*