कांदा निर्यात अनुदानास तीन महिन्यांची मुदतवाढ..!

0
धुळे । दि.29 । प्रतिनिधी-कांदा उत्पादक  शेतकर्‍यांच्या समस्या सातत्याने वाढत आहे व त्यांना वारंवार नुकसानीस तोंड द्यावे लगत आहे.
कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठीना.डॉ.सुभाष भामरे सातत्याने प्रयत्न करीत असतात. कांदा निर्यात अनुदानास जुलै ते सप्टेंबर असे तीन महिने मुदतवाढ देण्यास केंद्रीय अर्थ मंत्री ना.अरुण जेटली यांनी अनुमती दिल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली. 

नुकतीच ना.डॉ.सुभाष भामरे यांनी केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली त्यांच्या सोबत महाराष्ट्र राज्याचे अर्थ मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार उपस्थितीत होते.

जून महिन्याखेर संपणार्‍या कांदा निर्यात अनुदान योजनेस मुदत वाढ मिळावी यासाठी केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन कांदा उत्पादकांची समस्या मांडली.

सुमारे 20 महिन्यांपासून कांदा बाजारात मंदी असून गेल्या उन्हाळी हंगामातही उच्चांकी उत्पादन झाल्याचे निदर्शनास आणून दिले.

देशांतर्गत बाजारात अतिरिक्त ठरू पाहणारे उप्त्पादन निर्यातीच्या माध्यमातून हलके करण्यासाठी अनुदान सुरु ठेवणे गरजेचे आहे अशी भूमिका मांडली  यावर  ना.अरुण जेटली यांनी पुढील तीन महिने अनुदान सुरु ठेवण्यास मान्यता दिली व तसे निर्देश निर्गमित करण्यात येतील असे सांगितले.

निर्यात अनुदानमुळे गेल्या आर्थिक वर्षात इतिहासातील सर्वात अधिक कांदा निर्यात झाली आहे. कांद्याचे बाजारभाव किमायाती पातळीवर आणण्यासाठी यापुढेही पाठपुरावा सुरूच ठेऊ असे ना.डॉ.सुभाष भामरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*