गटविकास अधिकार्‍यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकले

0
शिंदखेडा/दोंडाईचा । दि.29 । प्रतिनिधी, वि.प्र.-शिंदखेडा पंचायत समितीची मासिक सभा आज दुपारी 12 वाजता उपसभापती सुनिता निकम यांच्या उपस्थितीत होणार होती.
मात्र सभापती अनुपस्थित असल्याने सभागृहात उपसभापती यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित झाली. सेनेचे सदस्य शानाभाऊ सोनवणे यांनी अनुपस्थित अधिकार्‍यांबाबत प्रश्न उपस्थित केला. 50 टक्केपेक्षा अधिक अधिकारी अनुपस्थित असतील तर सभा घ्यायची कशासाठी? हा मुद्दा उपस्थित करत संतप्त सदस्यांनी पं.स.सभागृह व गटविकास अधिकार्‍यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मिटींग बोलावली असल्याचे सभेचे प्रमुख गिरासे यांनी सांगितले.

यामुळे वरिष्ठ विभागाच्या मिटींग असतांना मासिक सभा नको किंवा मासीक सभेच्या दिवशी विभाग प्रमुखांनी जाऊ नये असा ठराव पारीत झाला असतांना आज पुन्हा तोच प्रकार घडला, असे म्हणत उपसभापती सुनिता निकम, शानाभाऊ सोनावणे, मनोहर देवरे, नानाभाऊ सोनवणे, सायंकाबाई मोरे, विलाबाई भील यांनी सभास्थळावरून उठून सभागृहाला कुलूप लावले.

सभापती सुनंदा गिरासे यांचे पती नरेंद्र गिरासे व उपसभापती सुनिता निकम यांचे पती विश्वनाथ पाटील यांच्यात यावेळी शाब्दीक बाचाबाची झाली.

सत्ताधारी भाजपाचे सदस्या सरला बोरसे, मालती बिर्‍हाडे वगळता दरबारसिंग गिरासे, संजीवनी सिसोदे यांच्यात आणि शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य यांच्यातही शाब्दीक वाद झालेत.

जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताच पंचायत समितीच्या आवारात गोंधळ वाढला.

अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीला पीआरसीचा दौरा कारणीभूत ठरला. यामुळे संघर्ष झाला. शिंदखेडा पंचायत समितीच्या बहुतांशी मासिक सभेत विभाग प्रमुखांसह इतर अधिकारी नियमित गैरहजर असतात.

सभेत वारंवार सुचना देऊनही तोच प्रकार नियमित झाला. तसेच पीआरसी संदर्भात मिटींग होती तर सभा नंतर घेता आली असती असे उपस्थित सदस्यांनी सांगितले.

भाजपाचे सदस्य प्रथम सभा होऊ द्या, असे सांगत होते. मात्र सुनिता निकम, शानाभाऊ सोनवणे, मनोहर देवरे, नानाभाऊ सोनवणे, सायंकाबाई मोरे, निलाबाई भील यांनी अधिकारी नसतील तर सभा होणार नाही, असा आग्रह धरला. तद्नंतर भाजपा सदस्यांनी सभागृहाला कुलूप आम्ही लावू असे सांगताच सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य संतप्त झाले.

यातून एकमेकांना धक्काबुक्कीही झाली. सत्ताधारी व विरोधी एकमेकांशी भिडले. यामुळे तालुक्यातील वैयक्तीक कामासाठी आलेले शेतकरी यांनी मोठी गर्दी केली.

 

LEAVE A REPLY

*