योगाच्या माध्यमातून होतो परिपूर्ण व्यायाम – डॉ. सुभाष भामरे

0
धुळे |  प्रतिनिधी :  चांगले आरोग्य उत्तम वरदान आहे. चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे. व्यायामामध्ये परिपूर्ण व्यायाम योग व्यायाम आहे. योग जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी येथे केले.

जागतिक योग दिनानिमित्त पोलिस कवायत मैदानावर विश्व योग दिन संयोजन समिती व जिल्हा प्रशासनातर्फे आज सकाळी कार्यक्रम झाला. त्यावेळी मंत्री डॉ. भामरे बोलत होते.

यावेळी महापौर कल्पना महाले, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरण, महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, चंद्रकांत केले, रवी बेलपाठक, अनुप अग्रवाल, संदीप बेडसे, ओमप्रकाश खंडेलवाल, राजेश वाणी, संतोष अग्रवाल आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. भामरे म्हणाले, योग विद्येस तीन हजार वर्षांची परंपरा आहे. जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत योग विद्या पोहोचली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जागतिक योग दिन साजरा केला जातो. योगाच्या माध्यमातून शरीर व मनाचा सर्वांगीण व्यायाम होतो.

त्यामुळे योग जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. नियमितपणे योगाभ्यास केला पाहिजे. त्यामुळे शरीर व मन तंदुरुस्त राहण्यास मदत होईल, असेही मंत्री डॉ. भामरे यांनी नमूद केले.

उदघाटन सोहळ्यानंतर योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली. त्यात उपस्थित सर्व मान्यवर सहभागी झाले होते.

याशिवाय नागरिक, प्रशिक्षणार्थी पोलिस, शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जितेंद्र भामरे यांनी योग प्रात्यक्षिकांचे संचलन केले. प्रा. भिकाजी बारसे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*