शिक्षक पात्रता परीक्षा २२ जुलैला

0
धुळे |  प्रतिनिधी :  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २२ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन आवेदनपत्र ३० जूनपर्यंत भरता येणार आहे.

शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा दि.२२ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षणसेवक शिक्षक पदांवर नियुक्त असलेल्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

परीक्षेसंबंधी माहिती संकेतस्तळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी १५ ते ३० जूनपर्यंत आहे. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट १० ते २२ जुलैदरम्यान काढता येईल.

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १, दि.२२ जुलै रोजी घेण्यात येईल. तर त्याच दिवशी पेपर २ दुपारी ४.३० वाजता घेण्यात येईल.

LEAVE A REPLY

*