धुळ्याच्या प्रभाकर चित्रमंदिरात गुंजला सचिन सचिन चा नाद : देशदूततर्फे सचिन चित्रपटाचे मोफत प्रदर्शन

0

धुळे | प्रतिनिधी :   शालेय विद्यार्थ्यांच्या ‘सचिन…. सचिन…… आय लव्ह सचिन….. च्या निनादात आज धुळ्यातील प्रभाकर चित्रमंदिर गजबजुन गेले. निमित्त होते ‘देशदूत’तर्फे आजच्या सकाळी साडेनऊ वाजेच्या ‘सचिन’ चित्रपट महोत्सवाचे

शालेय विद्यार्थ्यांना मास्टर ब्लास्टर महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरच्या जीवनकार्यावर आधारीत ‘सचिन ए बिलियन ड्रिम्स’ हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला.

या महोत्सवाच्या उदघाटनाप्रसंगी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेचे चेअरमन माजी आ.राजवर्धन कदमबांडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, जि.प.सीइओ डी.गंगाथरण संकल्प क्लासेसचे प्रा.गिरीष साळुंखे, यश क्लासेसचे उमेश भांडारकर आणि राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्थेचे चेअरमन संजय भामरे, देशदूतचे संपादक हेमंत अलोणे, व्यवस्थापक सुनिल बहाळकर, पोलिस अधिक्षकांची कन्याकु.स्मिता वव चि. शान आदी उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी ठेवून ‘देशदूत’तर्फे जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जातात.अशाच प्रकारचा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी ‘देशदूत’ने जिल्ह्यात आयोजित केला आहे. दि.१५ जूनपासून सुरू असलेल्या या महोत्सवाचा समारोप दि.१८ जून रोजी झाला.

संकल्प क्लासेसचे प्रा.गिरीष साळुंखे, यश क्लासेसचे उमेश भांडारकर आणि राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्थेचे चेअरमन संजय भामरे यांचे या चित्रपट महोत्सवास सहकार्य लाभले.

शालेय विद्यार्थ्याचा निनाद

एरवी चित्रपट गृहात शांतता असते. मात्र आजच्या चित्रपटाच्या वेळी मात्र चिमुकल्यांनी ‘ सचिन….. सचिन…. सचिन… सचिन , असा एकसुरात व टाळ्यांच्या कडकडाट केला. त्यामुळे निवृत्तीनंतरही सचिन अजूनही चिमुकल्यांच्या मनात लोकप्रियतेच्या शिखरावर असल्याची प्रचिती आली.

LEAVE A REPLY

*