‘देशदूत’तर्फे उद्या धुळ्यात ‘सचिन’ जल्लोष

0
धुळे |  प्रतिनिधी :  ‘देशदूत’तर्फे दि.१८ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता धुळे येथे प्रभाकर चित्रमंदिरात ‘सचिन’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

या महोत्सवाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे, क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेचे चेअरमन माजी आ.राजवर्धन कदमबांडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची उपस्थिती राहणार आहे.

सामाजिक बांधिलकी ठेवून ‘देशदूत’तर्फे जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जातात. अशाच प्रकारचा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी ‘देशदूत’ने जिल्ह्यात आयोजित केला आहे

. दि.१८ जूनपर्यंत या महोत्सवांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सचिन चित्रपट पाहण्याची संधी मिळत आहे.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांना मास्टर ब्लास्टर महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरच्या जीवनकार्यावर आधारीत ‘सचिन ए बिलियन ड्रिम्स’ हा चित्रपट विद्यार्थ्यांना मोफत दाखविण्यात येत आहे.

संकल्प क्लासेसचे प्रा.गिरीष साळुंखे, यश क्लासेसचे उमेश भांडारकर आणि राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्थेचे चेअरमन संजय भामरे यांचे या चित्रपट महोत्सवास सहकार्य लाभत आहे.

या चित्रपटाचा शालेय विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन देशदूत परिवारातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*