धुळे रा.काँ.शहर जिल्हाध्यक्ष मोरे यांचा राजीनामा

0
धुळे । प्रतिनिधी :  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षासह सदस्यपदाचा राजीनामा आज प्रदेशाध्यक्षांकडे दिला़ यामुळे ऐन महापालिका निवडणूकीच्या दरम्यान राष्ट्रवादी पक्षाला खिंडार पडले आहे. मनोज मोरे हे भाजपात जाणार अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे.

पण मोरे यांनी याला दुजोरा दिलेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता़ गेल्या दोन महिन्यांपासून मोरे हे भाजपात जाणार असल्याची चर्चा होती़ शिवाय मोरे हे पक्षापासून अंतर राखून होते़

पक्षात गेल्या काही महिन्यांपासून घुसमट होत असल्याने नाईलाजाने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे़ राजवर्धन कदमबांडे यांनी माझ्यावर नितांत प्रेम केले़ त्यामुळे त्यांच्याबद्दल मनपात कोणताही किंतू, परंतु नाही़ पक्ष सोडला तरी त्यांच्याबद्दलचा आदर कमी होणार नाही़ अन्य पक्षात जाण्याबाबत निर्णय अजून घेतलेला नाही. असेही मोरे यांनी सांगितले.

श्री. मोरे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना आज राजीनामा पाठविला असून धुळे जिल्हा शहर अध्यक्ष व पक्षाचा सदस्य पदाचा राजीनामा देत असून गेल्या 19 ते 20 वर्षांपासून पक्षाकडून मिळालेल्या सहकार्याबदल धन्यवाद असे राजीनाम्यात नमूद केले आहे.

राजीनाम्याची प्रत माजी आ. राजवर्धन कदमबांडे यांनाही पाठविण्यात आली आहे. श्री. मोरे यांच्या राजीनाम्याबदल माजी आ. कदमबांडे यांच्याशी संर्पक केला असता त्यांनी याबाबत मला काहीही माहिती नाही. माझ्यापर्यंत याबाबत काहीही आलेले नाही. असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*