शिंदखेडा येथे देशदूत आयोजित सचिन चित्रपटाला चिमुकल्यांनी केला जल्लोष ‘ सचिन… सचिन.’

0
धुळे| प्रतिनिधी : दै. देशदूत आयोजित सचिन अ ब्रिलीयन डिम्स चित्रपटाचा आज सकाळी दहाच्या सुमारास शिंदखेड्यातील अशोक सिनेप्लेक्समध्ये शुभारंभ झाला.

क्रिकेटमधील सर्वांचा लाडका आणि आवडता खेळाडू म्हणजे सचिन तेंडूलकर. त्याच्या जीवनावर तयार करण्यात आलेला सचिन हा चित्रपट देशदूततर्फे शालेय विद्यार्थ्यांना मोफतमध्ये दाखवण्यात येत आहे.

सचिन..सचिन.. चा जल्लोष

क्रिकेट जगताचा देव म्हणून सचिन तेंडुलकरची जादू आहे. त्यामुळे चित्रपट सुरू झाल्यानंतर सचिनच्या जीवनातील एकेक प्रसंग पाहतांना चिमुकले क्रिकेटवीर ‘सचिन…. सचिन…’ चा जल्लोष करत आनंद व्यक्त करत आहेत. शिंदखेडा ये लि अशोक सिनेप्लेक्समध्ये हा चित्रपट या क्षणाला सुरू आहे.

LEAVE A REPLY

*