पुण्यात बसच्या धडकेत कापडण्याचा युवक ठार

0
कापडणे |  प्रतिनिधी :  येथील रहिवाशी व सध्या पुणे येथील महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीत मानव संसाधन अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले परिक्षित भगवान पाटील(वय ३५) यांचे पुणे येथे अपघाती निधन झाले.

धुळे जि.प.चे माजी कृषी सभापती व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव यांचे ते पुतणे होते.

ड्युटीवर जात असतांना बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. परिक्षित महिंद्रा अन्ड महिंद्रा कंपनीत सिनीयर मानव संसाधन अधिकारी म्हणून कार्यरत होते.

पुणे येथील डि. वाय. पाटील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. प्रा.अरविंद जाधव यांच्यासह कुटुंबिय  पुण्याला रवाना झाले. परिक्षित पाटील हे भोकरचे अरुण धडू पाटील यांचे जावई होत. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:ख्याचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.

 

LEAVE A REPLY

*