स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महावितरणात स्वच्छ कार्यालय उपक्रम

0
धुळे |  प्रतिनिधी : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महावितरणच्या जळगाव परिमंडळाच्या वतीने जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात माझं कार्यालय, स्वच्छ कार्यालय उपक्रमास सुरूवात झाली असून या उपक्रमाचा समारोप दि. २१ जुन रोजी होणार आहे.

या उपक्रमात मंडळ, विभाग, उपविभाग, शाखा व उपकेंद्र स्तरावरील सर्व कार्यालये सहभागी झाली आहेत.

महाराष्ट्राला संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज या महापुरूषांचा वारसा लाभलेला आहे. समाजाला स्वच्छतेबाबत कृतीशील संदेश देण्याचे कार्य त्यांनी केले.

या परंपरेचा प्रत्येकाला अभिमान आहे. केंद्रसरकार व राज्य सरकार महात्मा गांधी यांचे जयंतीचे औचित्याने दि.२ ऑक्टेाबर २०१४ पासून एक पाऊल स्वच्छतेकडे हे ब्रीद घेउन स्वच्छ भारत अभियान राबवित आहे.

या अभियानाचा भाग म्हणून महावितरणच्या वतीने माझं कार्यालय, स्वच्छ कार्यालय उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वच्छता ही शारिरीक व मानसिक आरोग्याची गुरूकिल्ली आहे. कार्यालय व कार्यालयीन परिसर स्वच्छ राहिल्यास अधिकारी-कर्मचारी वर्गाचे मन प्रसन्न राहून कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.

कार्यालयात कामानिमित्त येणा-या ग्राहकांनाही समाधान वाटेल हा उपक्रमाचा मुळ हेतू आहे.

स्वच्छता उपक्रम प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी टेबल, कपाट, दालन स्वच्छ ठेवणे. सर्व जुनेरेकॉर्ड, वर्ष व विषयनिहाय वर्गीकृत करून व्यवस्थित बांधून नोंदवही तयार करणे.

कार्यालयातील कपाट व इतर साहित्याची मांडणी, कर्मचारी बैठक व्यवस्था रचना सुटसुटीत व शिस्तबध्द करणे. शाखा व उपकेंद्र कार्यालयातील कर्मचारी यांनी गणवेशात असणे. कार्यालयीन इमारतीचा संपुर्ण परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवणे. पिण्याचे पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह साफसफाई, कार्यालय व परिसरातील असंबंध व जुने संदेशाचे फलक, लेखन, स्टीकर काढून टाकणे.

नाविन्यपुर्ण आकर्षक कृतीमध्ये टाकाउपासून टिकाउ वस्तूची निर्मिती करणे हे निकष राहणार आहे. स्वच्छता मुल्यांकन समिती मार्फत जुलै महिन्यात विभाग, उपविभाग, शाखा व उपकेंद्र प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*