मनपा शिक्षिका व मदतनीस यांना मानधन वाटप

0
धुळे । मनपा इंग्रजी माध्यमाच्या शिक्षिकांना आज मानधन अदा करण्यात आले. त्यावेळी महापौर सौ. कल्पना महाले यांच्याहस्ते शिक्षीकांचा पुष्पगुच्छ व शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

शहरात इंग्रजी माध्यमाच्या मनपाचा चार शाळा आहेत. त्यात एकुण 965 विद्यार्थी शिक्षण घेतात. 23 शिक्षीका आणि 4 बालवाडी मदतनिस असे एकुण 19 कर्मचारी आहेत. बालवाडी मदतनिस यांना 4500 तर इंग्रजी माध्यमाच्या शिक्षीकांना 5000 रूपये मानधन देण्यात येते.

शालेय व विद्यार्थ्यांच्या स्टेशनरीसाठी 500 रूपये देण्यात येतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना रोज अल्पोपहारासाठी बालकल्याण विभागातर्फे देण्यात येतो. धुळे मनपा शाळा क्र. 3, 9, 14 25 या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत.

ज्युनियर व सिनियर बालवाडी मदतनिस व शिक्षिका यांना मानधन देण्यात आल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले. महापौर, आयुक्त, उपायुक्त, प्रशासन अधिकारी आणि मनपा शिक्षण मंडळाच्या सहकार्यामुळे हा लाभ मिळाला. महापौर सौ. कल्पना महाले, आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त रविंद्र जाधव, यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मच्छिंद्र निकम, माजी मनपा शिक्षण मंडळ सदस्या सौ. छाया करनकाळ, सुनिका चव्हाण, सुरेखा भामरे, नाजमा शेख, पल्लवी मराठे, नेहा जोशी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*