हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे महिलांचा गौरव

0
धुळे । हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे सार्वजनिक जीवनात काम करतांना वेगळा ठसा समाज मनावर उमटविणार्‍या दहा महिलांचा आज गौरव करण्यात आला.

येथील आग्रारोडवरील समितीच्या कार्यालयात सायंकाळी सत्काराचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीच्या महिला निमंत्रक तथा महापौर सौ. कल्पना महाले या होत्या.

सार्वजनिक जीवनात काम करतांना श्रीमती सुमनताई चांडक, श्रीमती अलका बियाणी, सौ. हिराबाई गवळी, डॉ. विजया माळी, श्रीमती विनाताई चौधरी, सौ. शोभा जाधव, संस्कार भारतीच्या सौ. निलाताई रानडे, स्त्री शिक्षण संस्थेच्या श्रीमती अनुराधा गरुड, कल्पनाताई शहा, डॉ. माणिकताई महाजनी यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. त्याची दखल समितीने घेवून आज दि. 13 मार्च रोजी या महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी समितीच्या सौ. ज्योत्स्ना मुंदडा, सौ. राखी अग्रवाल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*