सिमा रंधे यांना समाजरत्न पुरस्कार

0
बोराडी । वार्ताहर : सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल बोराडी येथील सौ.सिमा तुषार रंधे यांना श्री स्वामी विवेकानंद समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुणे पिंपरी चिंचवड येथे संस्कार प्रतिष्ठान यांच्या वतिने पुण्याच्या महामहापौर अपर्णाताई डोके यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर सौ.शैतजा मोरे, किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, बाळासाहेब शिंदे, चित्रा तुके, सौ.अश्विनीताई चिंचवडे, सौ.करुणाताई चिंचवडे, मिस इडिया पेसिफिक अभिनेत्री शिप्रा टुपके, संगमनेर महिला बाल कल्याण समितीचे अध्यक्ष शबाना बेपारी, मुख्याध्यापिका सौ.छाया सिनक, विजय पाटील, आदी उपस्थित होते.

सौ.सिमा रंधे यांनी बोराडीसह परिसरातील गरजू महिलाचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यांचे काम केले आहे. त्यांचबरोबर त्यांनी आदिवासी भागातील महिलांसाठी विविध शासकिय योजना त्यांच्यापर्यत पोहचून त्यांचा लाभ मिळवून दिला आहे.

त्या बोराडी गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत. त्यांनी स्व:खर्चातून आदिवासी भागात पाणी टंचाई दुर करण्यासाठी बोरविहिर करुन नविन पाईप लाईन व इतर सर्व साहित्य उपलब्ध करुन 6 ते 7 गावातील ग्रामस्थाची पाण्यासाठीची वनभटकती थांबवली. तसेच गटात विविध विकास कामे केली आहेत. म्हणून या सर्व चांगल्या कामांची दखल घेत पुणे पिंपरी चिंचवड येथील संस्कार प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यस्तरीय श्री स्वामी विवेकानंद समाजरत्न पुरस्कार सौ.सिमा तुषार रंधे यांना देण्यात आला.

सामाजिक व राजकिय क्षेत्रातील पुरस्कारासाठी राज्यस्तरीय श्री. स्वामी विवेकानंद समाजरत्न पुरस्कारासाठी सौ. सिमाताई रंधे यांनी निवड करण्यांत आली होती. असे श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड वतिने सांगण्यांत आले.

LEAVE A REPLY

*