…तर देशाचे भविष्य उज्ज्वल – रमेश रत्नपारखी

0
दोंडाईचा । वार्ताहर: शिक्षणामुळे माणसाची वैचारिक व बौध्दीक पातळी वाढते त्याचा उपयोग अग्रक्रमाने व्यवहारासाठी करायचा असतो. त्याचप्रमाणे नोकरी मिळविण्यासाठी केला पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरी मिळविणे सोपे झाले आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतांना आपल्या वडीलोपार्जित शेती व्यवसायाला दुय्यम ठरवू नये. युवकांनी शेतीला उद्योगाचा दर्जा दिला तर देशाचे भविष्य उज्ज्वल असेल असा विश्वास शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी व्यक्त केला.

दोंडाईचा येथील स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे, दादासाहेब रावल महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी सी.एन्.राजपूत होते. दादासाहेब रावल यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्राचार्य डॉ.एस.एस.राजपूत यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक, सांस्कृतिक तथा क्रीडा विषयक कामगिरीचा आढावा घेतला. उपप्राचार्य व्ही.एस्.पटेल यांनी प्रास्ताविक केले.

शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी बजावण्याचा विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शैक्षणिक पारितोषिकांचे वाचन समितीचे समन्वयक प्रा.डॉ.सी.एम.जाधव यांनी तर क्रीडा पारितोषिकांचे वाचन क्रीडा संचालक प्रा.डॉ.डी.पी.धाकड यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.संजीव गिरासे यांनी केले. तर आभार उपप्राचार्य डॉ.के.डी.गिरासे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*