विरदेल येथे गुरांना आजाराची लागण

0
विरदेल । वार्ताहर: येथे गुरांना होणार्‍या संसर्गजन्य रोग लाळखुरकत रोगाची लागण जोरात होत असल्याने गुरांचा जीव धोक्यात आला आहे. वास्तविक दर नोव्हेंबर महिन्यात गुरांना लसीकरण होणे आवश्यक आहे.

मात्र विरदेल परिसरात कार्यरत असलेला पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत उपाय योजना होत नसल्याने गुरांचा जीव धोक्यात असल्याचे चित्र दिसत आहे.

लाळखुरकत हा बैलांना होणार संसर्गजन्य रोग आहे. याची लक्षणे बैलांच्या खुरात जखमा होणे, लाळ गळणे, जिभेची टोप निघून जाणे, गुरे चारा पाणी खात नाही तसेच तापाचे प्रमाण जास्त दिसून येते. गुरांना होणार हा आजार संसर्ग जन्य असून साधारणपणे हवेच्या संपर्कात याची लागण जोरात पसरते व एकाच खळ्यात किंवा गोठ्यात या रोगाची लागण जोरात पसरते.

त्यामुळे पशुपालक चिंता व्यक्त करत आहेत. असे असतांना विरदेल येथे कार्यरत असलेले पशुवैद्यकीय दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांकडून उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत त्यांच्या गैरहजेरी व कामाबाबत गावात नाराजी व्यक्त होत आहे.

दुग्ध जन्य पशुंना देखील या रोगाची लागण होत असल्याने दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण ज्या दुधाळ पशूंना याची लागण होते, त्या गाई, म्हशी दुध देणे बंद करतात किंवा त्यांना दुधच येत नाही. म्हणून वेळीच विरदेलसह परिसरात लसीकरण मोहीम राबविण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

*