पटेल फार्मसीच्या 13 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूत निवड

0
शिरपूर । येथील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयात अंतिम वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई येथील टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसच्या (टि.सी.एस) बिसिनेस प्रोसेसिंग सर्विस विभागातर्फे फार्मा कोव्हिजिलन्स आणि क्लिनिकल डेटा मॅनेजमेंटच्या विविध पदासाठी कॅम्पस इंटरव्हू घेण्यात आले. त्यात 13 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

कंपनीतर्फे प्रियांका शिंगाडे (मानव संसाधन विभाग), विजय काळे (टेकनिकल विभाग) आणि परमवीर सूर्यवंशी (व्यवस्थापन विभाग) यांनी मुलाखत प्रक्रिया पार पाडली.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांनी प्रथम टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, टाटा ग्रुप त्यांचे ग्लोबल मार्केट, मुख्य ऑफिस , कर्मचारी, काय आणि कोणत्या प्रकारच काम केले जाते, कोणकोणत्या सर्व्हीसेस व सुविधा पुरवल्या जातात याबद्दल तसेच विद्यार्थी कोणकोणत्या क्षेत्रात कशाप्रकारे काम करून भविष्य घडवू शकतात याबद्दल माहिती दिली.

फार्माकोव्हिजिलन्स आणि क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट क्षेत्रात औषधावर होणार्‍या क्लिनिकल ट्रायलच्या फेज 1 ते 4 स्टडीचे निरीक्षण आणि निष्कर्ष यांचा डेटा व्यवस्थित पद्धतशीर मांडण्याचे काम केले जाते. मुलाखतीसाठी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी डॉ. अनिल टाटीया व सहकारी डॉ. मनोज गिरासे , प्रा. प्रमोद पाटील, प्रा. सौरभ गणोरकर, प्रा.विनोद उगले व रजिस्ट्रार जितेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सराव म्हणून 3 अभिक्षमता चाचण्या घेतल्या.

डॉ. अनिल टाटीया व सहकारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उप-प्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर यांनी विदयार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाचे या यशाबद्दल कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

चार टप्प्यामध्ये मुलाखती
या निवड प्रक्रियेत सर्वप्रथम विदयार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले. त्यानंतर चार टप्प्यामध्ये इंटरव्हू झाला.प्रथम सामूहिक चर्चा (ग्रुप डिस्कशन), अभिक्षमता चाचणी (अँटिट्यूड विषयानुरूप प्रश्नावली (टेक्निकल) आणि शेवटी प्रत्यक्ष मुलाखत (मॅनजेरिअल) असे चार टप्पे पार करत 13 विद्यार्थ्यांची निवड झाली. निवड झालेल्या विदयार्थ्यांना 2 लाख प्रति वार्षिक असे पॅकेज देण्यात येणार आहे .

LEAVE A REPLY

*