शेतकर्‍यांनी काम रोखले

0

धुळे / धुळे – नंदुरबार जिल्ह्यातून जाणार्‍या नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गाचे काम शेतकरी संघर्ष समितीने आज सोमवारी मोराणेजवळ आंदोलन करून काम बंद पाडल़े यावेळी कंपनीचे सदस्य व शेतकर्‍यांमध्ये बाचाबाची झाली़ .

शेतकर्‍यांनी आक्रमक भुमिका घेतल्याने कंपनीला काम बंद ठेवावे लागले.

शेतकर्‍यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय ,

दि. 26 एप्रिलपासून शेतकरी संघर्ष समितीने चौपदरीकरणाचे काम बंद पाडले होत़े.

मागण्या मान्य होईर्पयत चौपदरीकरणाचे काम सुरू होऊ देणार नाहीत, अशी भुमिका शेतकर्‍यांनी घेतली घेतली होती़ त्यामुळे चौपदरीकरणाचे काम तेव्हापासून बंद होत़े कंपनीच्या कर्मचार्‍यांनी आज पुन्हा काम सुरू केल्याचे शेतकर्‍यांना समजले.

त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीने सोमवारी मोराणे गावाजवळ आंदोलन केल़े शेतकर्‍यांच्या या आंदोलनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता़.

सकाळी धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी सुमारे 30 वाहनांमधून सुरत बायपास रस्त्यावर आले.

यावेळी महामार्ग चौपदरी करणाचे काम करणार्‍या कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांना जाब विचारले. जिल्हाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लागतील असे आश्वासन दिलेले असतांना काम कसे काय सुरु झाले असा सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला.

त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना दमदाटी करून हे काम पुढे रेटले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मुकटीपासून नवापूर पर्यंत सुमारे 140 कि.मी. पर्यंतचे काम थांबले आहे.

 

LEAVE A REPLY

*