शिवसेनेचे जलआंदोलन

0
धुळे / शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे जलआंदोलन करण्यात आले. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी काही शेतकर्‍यांशी हातमिळवणी करून वेळकाढू धोरण अवलंबले आहे. याचा शिवसेना निषेध करीत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, 1 जून 2017 पासून शेतकरी संपावर गेला आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी विविध आंदोलने केली. मात्र सरकारने काही शेतकरी नेत्यांशी हातमिळवणी करून वेळकाढू धोरण अवलंबलेले आहे. ते निषधार्थ आहे.
म्हणून मागण्या मान्य होईपर्यंत पाण्यात उभे राहून जल आंदोलन करीत आहोत. दोन दिवसात योग्य निर्णय झाला नाही तर अन्नत्याग करण्यात येईल.

जल समाधी घेण्यात येईल. शेतकर्‍यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफ करून सातबारा कोरा करावा, शेतकर्‍यांना शेतीमालाच्या उत्पन्नाच्या दिडपट हमी भाव द्यावा, शेतकर्‍यांना वयाच्या 60 वर्षानंतर 5000 रु. पेन्शन लागू करावी, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घ्यावे.

शेतकर्‍यांना शेती करण्यासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे व समृध्दी महामार्गामुळे शेतकरी भुमीहिन होत आहे. त्याबदल सुपीक जमीन द्यावी किंवा धोरणानुसार भाव द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे, उपतालुका प्रमुख राजू रगडे, युवासेना तालुकाप्रमुख मयुर निकम, बाम्हणे विभाग गणेश भदाणे, ग्रामीण तालुका प्रमुख कल्याण बागुल, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, बळीराजा संघर्ष अध्यक्ष राकेश गिरासे, शहर प्रमुख चेतन राजपूत, शेवाडे गटप्रमुख बबलू कोळी, विभागप्रमुख किरण साबळे, योगेश सोनवणे, बापु आखडमल, भुषण सोनवणे, जगदीश शिरसाठ, गुड्डु सोनवणे, गंगाराम शिरसाठ आवदास शिरसाठ, कैलास शिरसाठ, विलास ईशी, जगन शिरसाठ, देवराम आखडमल, भाऊसाहेब शिक्षरसाठ, कन्हैया वाकडे, अनिल वाकडे, रविंद्र सावळे, बाळकृष्ण वाकडे, मयुर सोनवणे, दयाराम चव्हाण आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*