दांपत्याचा विष प्राशनकरून आत्महत्येचा प्रयत्न; पतीचा मृत्यू

0
धुळे / वरझडी येथील एका दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पतीचा मृत्यू झाला तर महिलेची प्रकृती गंभीर आहे.
तिच्यावर हिरे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. या घटनेमागील कारण समजू शकले नाही.

भटू भुरमल पाटील आणि सुरेखा भटू पाटील या दाम्पत्याने मंगळवारी विष प्राशन केल्याने त्यांना त्रास होवू लागला.

यानंतर त्यांना उपचारासाठी हिरे मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान भटू पाटील यांचा रात्री मृत्यू झाला. तर सुरेखा पाटील यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. या घटने मागील कारण अद्याप समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

*