Type to search

maharashtra आवर्जून वाचाच धुळे

# Live Updates # धुळे लोकसभा मतदान : राबणाऱ्या हाताच्या बोटाना शाई कधी ?

Share
त-हाडी  | प्रतिनिधी :  संपूर्ण देशातभरात अपुर्व उत्साहात मतदानाची प्रक्रिया पार पाडत असताना उन्हात तान्हाहत विटा कामगार फोडणारी असंख्य पावरा कुटुंबे ही या मतदान प्रक्रियेपासुन कोसो दुर असल्याचे चित्र सोमवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानदरम्यान त-हाडी वरूळ परिसरात ठिकठिकाणी दिसत आहेत.

ही पावरा कुंटुबे विट कामगार कामावर आहेत गाव घरापासून सुमारे दोनशे किलोमीटर लांब पोटाची खळगी भरण्यासाठी अवघ्या तीनशे रुपयात भर उन्हात तान्हाहत हाताला फोड येईपर्यंत विटा बनविण्यासाठी विट कामगार ही पावरा कुंटुबे मतदानाला गेलेच नाहीत. मतदानासाठी गावाकड जाव तर दिवसाची तीनशे रुपयांची मजुरी बुडणार या मजुरीवर जगण्याची सारी भिस्त अवलंबून असलेल्या या मजुरांना आपल्या मताची किमत तरी कोण समजवणार?

मतदानाच्याबाबतीत या लोकांच्या मध्ये जागृती घडावी यासाठीचे प्रयत्न होत नसल्यामुळेच हे लोक आपल्या बहुमोल मतदानाच्या हक्कापासून वचीत आहेत मेक इन इडिया किंवा स्टार्टअप इडिया सारख्या घोषणा जर या देशात यशस्वी झाल्या असत्या तर मातीच्या ठिकाऱ्यातून स्वतः चे नशीब कोरणाऱ्याचेही या देशात भविष्य घडविण्याच्य प्रक्रियेत योगदान दिसेल असते.

संपूर्ण देशभरात मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा होत असतानाच या लोकांच्या हाती असलेल्या हातोड्यातुन गरिबाचे वास्तव समोर आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!