३० वर्षानंतरच्या भेटीची उत्सुकता, आश्‍चर्य, आनंद : ‘जयहिंद’च्या विद्यार्थ्यांनी दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

0
धुळे |  प्रतिनिधी :  ३० वर्षानंतरच्या भेटीची उत्सुकता, आश्‍चर्य, आनंद या संमिश्र भावना व्यक्त करुन जयहिंद महाविद्यालयातील १९८८ च्या बी.कॉम. शाखेच्या विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा दिला निमित्त होते स्नेहमिनल सोहळ्याचे.

जयहिंद महाविद्यालयातील १९८८ च्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी सुमारे ३० वर्षानंतर व्हॉट्सऍपच्या माध्यमातून संपर्कात आले होते. या माध्यमातून जुन्या मित्र, मैत्रिणींशी संपर्क करीत स्नेहमिलन सोहळ्याचा कार्यक्रम येथील मानस हॉटेल येेथे आयोजित करण्यात आला होता.

३० वर्षानंतर एकमेकांमधील झालेला बदल अनुभवत तसेच भेटी उत्सुकता व जुन्या आठवणींना उजाळा देत हा स्नेहमिलन सोहळा साजरा करण्यात आला. धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहमदाबाद, मुंबई, खेतिया या विविध ठिकाणाहून सुमारे ४५ मित्र-मैत्रीणी एकत्र आलेले होते.

आपल्या महाविद्यालयीन जीवनातील विविध आठवणी, प्राध्यापकांविषयी आत्मीयता या निमित्ताने उपस्थितांनी कथन केल्या. या स्नेहमिलनाच्या निमित्ताने समाजाप्रती असलेले आपले उत्तरदायित्व म्हणून सामाजिक कार्यातून सहयोग व सहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक व गुरुजणांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाविद्यालयीन आठवणींना जुन्या छायाचित्राद्वारे संकलीत करुन चित्रफितीद्वारे प्रदर्शीत केल्यानंतर अनेकांनी आपल्या भावभावनांना वाट मोकळी करुन दिली. दिवंगत मित्र-मैत्रीणींना श्रध्दांजली अर्पण करुन दिवसभर सुरु असलेल्या सोहळ्याची सांगता करण्यात आली.

या सोहळ्यात सुनिता सोंजे, माया सांगळे, निता सराफ, स्वाती शहा, रेखा दहिवदकर, जयश्री पवार, हेमलता देशमुख, निर्मला गिरासे, कविता चंद्रात्रे, नर्मता कोटेचा उमा बंग, संजय नागमोते, मिलिंद त्रिवणकर, विलास बाविस्कर, वसंत पाटील, साहेबराव जाधव, गणेश पिंगळे, इंदिरा राजपूत, सुनंदा खैरनार आदी सहभागी झाले होते.

स्नेहमिलन यशस्वी करण्यासाठी नितीन केले, ऍड. मिलिंद बोरसे, प्रशांत वारुडकर, खिमजी पटेल, गोपाल सोलंकी, शाम गवळी, मनोज वाघ, जयवंत जाधव, भैय्या पाटील, ऍड. सचिन झेंडे, मनोज डिसा, प्रवीण कोठारी, ऍड. शिरीष वैद्य, ऍड. संदीप सराफ, ऍड. विजय वाघ, नरेंद्र वसईकर आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*