जलयुक्त शिवार अभियानाची कामे तातडीने पूर्ण करावीत!

0
धुळे । जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 2016- 2017 या वर्षात निवडण्यात आलेल्या गावातील कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच 2017- 2018 या वर्षात निवड झालेल्या गावातील कामांसाठी तत्काळ प्रशासकीय मान्यता घेवून कामांना सुरवात करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी जलयुक्त शिवार अभियानाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपवनसंरक्षक जी. के. अनारसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (धुळे), नितीन गावंडे (शिरपूर), जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर, कृषी अधिकारी श्री. तागड आदी उपस्थित होते. डॉ. पांढरपट्टे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानाबाबत धुळे जिल्ह्यात झालेल्या कामांचा विभागीय आयुक्त व्हिडिओ कॉन्मरन्सद्वारे आढावा घेणार आहेत. 2016- 2017 या वर्षातील कामे मार्च 2018 अखेर पूर्ण करावीत. त्याचबरोबर या कामांचे 100 टक्के जिओ टॅगिंग होईल, असे नियोजन करावे. 2015- 2016 चा जल परिपूर्णत: अहवाल ग्रासमभेस सादर करुन याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याबाबत संबंधित सर्व विभागांनी तातडीने कार्यवाही करावी. तसेच 2015- 2016, 2016- 2017 या वर्षातील खर्चाची माहिती उपलब्ध करुन द्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी दिले.

जलयुक्त शिवार अभियानात 2016- 2017 या वर्षात 2290 कामे प्रस्तावित होती. त्यापैकी 1817 कामे पूर्ण झाली असून 343 कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच 2017- 2018 या वर्षात 1622 कामे प्रस्तावित असून आतापर्यंत 1201 कामांसाठी प्रशासकीय मान्यता घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

LEAVE A REPLY

*