शिक्षकाच्या कोठडीत वाढ

0
दोंडाईचा । येथील बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असणारा माजी बांधकाम सभापती व शिक्षक महेंद्र पाटील यास धुळे न्यायालयात हजर केले असता पुन्हा चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण संस्थेचा नूतन विद्यालयातील बालवाडीत शिक्षण घेणार्‍या पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणात अज्ञात लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीसह 6 जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमूरडीवर अत्याचार झाल्याने ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. निवेदन देऊन अटकेची मागणी केली जात आहे. या प्रकरणात दबाव व धमकी दिल्याप्रकरणी तीन दिवसापासून पोलीस कोठडीत असलेला माजी बांधकाम सभापती व शिक्षक आरोपी महेंद्र आधार पाटील यास दोंडाईचा पोलिसांनी धुळे सेशन कोर्टात हजर केले असता न्यायालयाने पुन्हा चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या प्रकरणातील दबाव व धमकी दिल्याप्रकरणी संशयित माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ.रवींद्र देशमुख, प्रतीक महाले, नगरसेवक नन्दु सोनवणे व मुख्य अत्याचारी हे अद्याप फरार आहेत. या आरोपीना अटक तात्काळ अटक करावी अशी पीडित माता पित्याची मागणी आहे. आरोपीना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

LEAVE A REPLY

*