धुळ्याच्या एलसीबीचे पोलिस निरीक्षक रमेशसिंग परदेशी यांनी केली आत्महत्या

0
धुळे | प्रतिनिधी : येथरल स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रमेशसिंग परदेशी यांनी त्यांच्या राहत्या घरी काल दि. १ च्या मध्यरात्री गोळी झाडून आत्महत्या केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,’रामेशसिंग परदेशी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात काम करुन शहर पोलीस ठाण्यात गेले. तेथून ते घरी परतले. त्यांनतर रात्री उशिरा बाहेर फिरण्यासाठी गेले.

तासाभरात परत आल्यानंतर त्यांनी बेडरूममध्ये सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून घेतली. गोळीचा आवाज ऐकून त्याची पत्नी खोलीत धावत गेली. या वेळी ही बाब त्यांच्या लक्षात आली.

त्यांची किंकाळी आणि गोळीचा आवाज ऐकून शेजारी राहणारे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे धावत परदेशी यांच्या बंगल्यात धावत आले. त्यांनी हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सांगितला.

या घटनेनंतर सर्व अधिकारी व कर्मचारी त्याच्या बंगल्यावर आले. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. परदेशी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आत्महत्या करण्यामागचे कारण समजु शकले नाही. त्यांची अंत्ययात्रा नाशिक येथील निवासस्थानी इंदिरा नगर, आत्मविश्वास सोसायटी, जानकी अपार्टमेंट २ येथुन दुपारी १ वाजता निघेल.

LEAVE A REPLY

*