तिसर्‍या दिवशीही बळीराजा रस्त्यावर

0
धुळे / शेतकर्‍यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिक आज रस्त्यावर उतरले. तसेच चाळीसगांव रोड चौफुलीवर रास्तारोखो केला.
यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांनी सर्व आंदोलकांना अटक केली आणि कारवाई करून सुटका केली.
आज शिवसेना धुळे जिल्ह्याच्यावतीने शिवसेना धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयापासून पदाधिकारी व शिवसैनिक मोटार सायकल रॅलीने चाळीसगांव रोड चौफुलीवर प्रचंड घोषणाबाजी करत धडकले.
चाळीसगांव रोड चौफुलीवर रण-रणत्या उन्ह्यात रास्तारोको करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून रास्तारोकोला सुरूवात केली. संपूर्ण शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली पाहिजे.
शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, लोडशेडींग बंद झाली पाहिजे,पीक विमा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, शेतकर्‍यांना ताबडतोब कर्ज पुरवठा झाला पाहिजे. अशा घोषणा देवून सरकारला धारेवर धरीत परिसर दणाणून सोडला.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने संपूर्ण जिल्हाभर शेतकर्‍यांच्या कर्ज मुक्तीसाठी शेतकर्‍यांच्या बांधावर जावून, घरी जावून, बाजारात जावून शिवसेनेचे पदाधिकारी फार्म भरून घेत आहेत. आणि त्यासाठी शेतकर्‍यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.

त्याचाच एक भाग म्हणून आज धुळे जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या कर्ज मुक्तीसाठी आणि शेतकर्‍यांच्या संपाला पांठिबा देण्यासाठी आज रास्तारोको करून सरकारचा निषेध व्यक्त केला.

सरकारने शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी आणि शेतकर्‍यांच्या शेती मालास उत्पादन खर्चाच्या तुलनेत हमीभाव द्यावा, सरकारने शेतकर्‍यांचा अंत बघू नये,शेतकर्‍यांना दिलासा न मिळल्यास सरकारला शेतकर्‍यांच्या रोषाचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला.

रास्तारोको केल्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना अटक केली आणि कारवाई करून सुटका केली.

LEAVE A REPLY

*