नकट्या बंधार्‍यात बुडून युवकाचा मृत्यू

0
निजामपूर  / साक्री तालुक्यातील निजामपूर-भामेर मार्गावर असलेल्या नकट्या बंधार्‍यात इंदूर येथील युवकाचा पाय घसरुन मृत्यू झाला.
पोलिसांनी अथक परिश्रम घेवून युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला याबाबत निजामपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, निजामपूर येथील म्हसाई माता मंदिराजवळ दि. 2 जून रोजी विवाह सोहळ्याचा कार्यक्रम होता. त्यासाठी इंदूर येथून स्वयंपाकासाठी काही जण आले होते.
त्यातील राजा विरेंद्र गोयल (वय19) हा युवक सकाळी मंदिराजवळील नकट्या बंधार्‍यात अंघोळीसाठी गेला. त्यावेळी अचानक त्याचा पाय बंधार्‍यात घसरल्याने तो पाण्यात बुडाला.
त्याला पोहता येत नसल्याने त्याने पाण्यात गटंगळ्या खाल्ल्या. याबाबची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जून पटले यांना देण्यात आले.

ते घटनास्थळी फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी गावातील पोहणार्‍यांच्या मदतीने त्याचा शोध घेतला परंतू रात्री 8 वाजेपर्यंत पाण्यातून राजा सापडला नाही.

बंधार्‍यात गाळ अधिक असल्याने शोधकार्यात अडथळा येत होता. आज दि. 3 जून रोजी सकाळपासून पुन्हा राजाचा बंधार्‍यात शोध घेण्यात आला.

पट्टीचे पोहणारे शैलेंद्र बारकू चव्हाण, मनोहर विक्रम ठाकरे, राजेश महादू माळचे, शामू नवल सोनवणे, सुनलि यशवंत बागले, तात्या गुलबा धनगर, पोलिस कर्मचारी कैलास तुळशिराम ढोले, कांतीलाल अहिरे यांनी बंधार्‍यात राजाचा शोध घेतला.

अथक परिश्रमातून राजाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. फागणे येथील खाजगी वाहन चालक छोटू पाटील यांनी देखील शोधकार्यात मदत केली.

मृतदेह काढण्यानंतर राजा गोपाल याचे वडील विरेंद्र छगनलाल गोपाल यांना माहिती देण्यात आली. याबाबत निजामपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*