कापडणे ग्रा.पं.सरपंचपदासाठी मंगळवारी निवडणूक

0
कापडणे / येथील ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी दि.6 जुन रोजी येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राजेंद्र साहेबराव पाटील यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणुक होत आहे.
जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणुन कापडण्याकडे पाहिले जाते. वर्चस्वासाठी राजकिय हालचालींनी वेग घेतला असुन दोन गट सक्रिय झाले आहेत. संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष याकडे लागले असुन कोणता गट बाजी मारतो याबाबत उत्कंठा वाढली आहे.
कापडणे ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी दि. 4 ऑगष्ट 2015 रोजी पंचवार्षिक निवडणुक संपन्न झाली. यानंतर दि. 22 ऑगष्ट 2015 रोजी झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत कॉग्रेसचे राजेंद्र साहेबराव पाटील तब्बल 14 मते मिळवित भाजपच्या उमेदवाराविरोधात विजय मिळविला.
आपल्या व्यक्तिगत अडचणींचे कारण पुढे करीत राजेंद्र पाटील यांनी गेल्या महिण्यात आपल्या पदाचा राजीनामा गटनेते भगवान पाटील यांच्याकडे सुपूर्त केला.

दि. 23 मे रोजी या राजीनाम्याची ग्रा.पं.कार्यालयात झालेल्या एका विशेष बैठकित पडताळणी करण्यात आली. यानंतर येथील राजकिय हालचालींना वेग आला.

धुळे तहसिलदारांच्या विशेष निर्देशान्वये येथील ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणुक दि.6 जुन रोजी जाहिर झाल्याने येथील राजकिय वातावरण ढवळुन निघाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकिय काऊंट डाउन सुरु झाल्याचे बोलले जात आहे.

 

LEAVE A REPLY

*