साहूर येथे पाण्यात उभे राहून शेतकर्‍यांचे आंदोलन

0
धुळे | प्रतिनिधी :  साहूर येथील शेतकरी व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी पाण्यात उभे राहून आंदोलन केले व येत्या ६ तारखेपर्यंत कर्जमुक्त करण्याचा निर्णय शासनाने न घेतल्यास ७ तारखेला पाण्यात उभे राहून बेमुदत उपोषण करणार व प्रसंगी जलसमाधी घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

शेतकर्‍यांनी पुकारलेल्या संपाला साहुर येथील शेतकर्‍यांनी व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी पाठिंबा दिला. शेतकर्‍यांना कर्जमुक्त करुन त्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे.

शेतकर्‍यांच्या मालाला खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तात्काळ लागू कराव्या व शासनाकडून जर शेतकर्‍यांना कर्जमुक्त करणे शक्य होत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. अशीही मागणी साहूर येथील शेतकर्‍यांनी केली.

या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व पं.स.सदस्य शानाभाऊ सोनवणे, यांनी केेले या आंदोलनात शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राजू रगडे, युवसेनेचे तालुका प्रमुख मयूर निकम, विभाग प्रमुख गणेश भदाने, उपविभाग प्रमुख ईश्‍वर महाले, साहूर गावातील शेतकरी विलास कोळी, लोटन दंगल, ज्ञानेश्‍वर कुंवर, शानाभाऊ शिरसाठ, कैलास शिरसाठ, ईश्‍वर वाकडे, रमेश सोनवणे, सुखदेव वाघ, हौदास शिरसाठ, हरचंद शिरसाठ, योगेश वाघ, योगेश सोनवणे, गंगाराम शिरसाठ, दयाराम सोनवणे, दुर्योधन सोनवणे, कैलास सोनवणे, बालकृष्ण चित्ते, महेंद्र सोनवणेसह इत्यादी शेतकर्‍यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

*