दोंडाईचा पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी चार कोटी ५८ लाखांचा आराखडा मंजूर : पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचा पाठपुरावा

0
दोंडाईचा |  प्रतिनिधी :  दोंडाईचा राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्याने येथील नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी तसेच शहर स्वच्छतेसाठी राज्य शासनाने सुमारे ४ कोटी ५८ लाखाचा खर्चाचा आराखडा मंजूर केला आहे.

यात पुढील २५ वर्षांसाठी स्वच्छता विषय उपाययोजनांचा समावेश आहे. हा आराखडा प्रत्यक्षात अंमलात आल्यानंतर शहरातील घनकचर्‍यांचा विषय कायमस्वरूपी निकाली निघण्यास मदत होणार आहे.

शहरातील स्वच्छताविषयक पुढील २५ वर्षांची गरज लक्षात घेऊन केंद्र शासनार्मफत नियुक्त इकोप्रो एनव्हायरमेंटल सिस्टीम या कंपनीमार्फत हा आराखडा तयार होवून तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला.

त्यानंतर हा आराखडा मंजुरीसाठी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यास स्वच्छताविषयक समितीने मान्यता दिली आहे.

यात पालिकेला देखील आपला हिस्सा द्यावा लागणार असून हा खर्च ठेका पध्दतीने कचरा संकलनाचे काम देऊन तसेच कचर्‍यापासून इंधन, गांडूळ खत यासह इतर प्रकल्प राबवून त्याद्वारे मिळणार्‍या उत्पन्नातून भागविण्याचा पालिकेचा विचार असून या निधीतर्ंगत अनेक साहित्य पालिकेला मिळणार असून त्यातून शहराची घनकचरा व्यवस्था कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.

पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी विशेष प्रयत्न करून हा आराखडा मंजूर करून घेतला आहे.

LEAVE A REPLY

*