भाजीपाल्याचे भाव कडाडले…!

0
धुळे । प्रतिनिधी :  भाजीपाला उत्पादन घटल्यामुळे बाजारात भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याने गृहिणी वर्गाचे अंदाजपत्रक कोसळले आहे. गृहिणींनी विविध डाळींचा वापर स्वयंपाकात सुरू केला आहे.

सध्या मिरची, वाटाणा, दोडके, वांगे, भेंडी, गवार, कोबी, याबरोबर कोथींबीर, मेथी तसेच इतर पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे मार्च महिन्यापासून जमिनीतील पाण्याची पातळी घटली आहे. नदी-नाले कोरडे ठाक झाले आहेत. तर विहिरींची पातळी प्रचंड प्रमाणात घटली आहे. यामुळे भाजीपाला उत्पादनात घट आल्याने बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा जाणवत आहे.

दरम्यान, उन्हाची तीव्रता भुजल पातळीत आलेली घट पिण्यासाठी पाणी गुरांना पाणी या समस्यांचे निराकारण कसे करावे हा प्रश्न उभा ठाकला असताना भाजीपाला उत्पादनासाठी पाणी उपलब्ध करणे जिकीरिचे असल्याने भाजीपाला उत्पादनावर याचा परीणाम झाल्याने महागडा भाजीपाला खरेदी करण्याची वेळ गृहीणी वर्गावर आली आहे.

काही भाज्या ऐंशी रुपये किलो तर काहींनी शंभरी गाठली आहेे. तसेच कोथींबीर, मेथीची भाजी व इतर पालाभाज्याही महाग झाल्याने गृहीणी वर्गाचे अंदाजपत्रक कोसळले असुन पावसाळा येईपर्यंत महागात भाजीपाला गृहीणी वर्गाला खरेदी करावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

*