चौगाव येथे वीज पडल्याने 500 क्विंटल कांदा जळून खाक

चौगाव येथील घटना, लाखोंचे नुकसान

0
धुळे । प्रतिनिधी :  धुळे तालुक्यातील चौगाव येथे कांदा चाळीवर विज कोसळून तब्बल पाचशे क्विंटल कांद्याचे नुकसान झाले असून कांदाचाळ जळून खाक झाली आहे.घटनास्थळाची माजीमंत्री रोहिदास पाटील यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकर्‍याशी चर्चा केली.

धुळे शहरासह तालुक्यात काल दि.14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास वादळ वार्‍यासह विजाच्या कडकडाटने अवकाळी पाऊस झाला. या पावसात धुळे तालुका आणि शहरात प्रचंड नुकसान झाले.धुळे तालुक्यातील चौगाव येथील शेतकरी ओंकार उदेलाल महाले यांच्या शेतातील कांदा चाळीवर विज कोसळली. कांदा चाळीत या शेतकर्‍याचा सुमारे 500 क्विंटल कांदा भरलेला होता.

विज कोसळल्याने कांदा चाळीसह कांदा जळून खाक झाला असून शेतकर्‍यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते सोमनाथ पाटील,माजी सरपंच सीताराम बागले, सरपंच रामकृष्ण पाटील, माजी उपसरपंच कृष्णा माळी,कमलाकर गर्दे, रघुनाथ महाले, मंडळाधिकारी किरण कांबळे, तलाठी कविता हाके व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*