डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना मोठी देणगी

0
धुळे । प्रतिनिधी :  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना ही सर्व जनतेसाठी सर्वात मोठी देणगी आहे. असे प्रतिपादन भाजपा आघाडीचे प्रदेश चिटणीस महेश काटकर यांनी केले.

शहरातील जेलरोड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महेश काटकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अनुयायांच्या सोबत बौद्ध वंदना करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला नमन केले. याप्रसंगी अभिवादन करण्यासाठी आलेल्या दिव्यांग बांधवांशी व नागरिकांशी महेश काटकर यांनी चर्चा केली. डॉ.आंबेडकर यांनी जनतेला दिलेला मतदानाचा अधिकार सर्वांनी बजावला पाहिजे, असे आवाहन देखील काटकर यांनी केले.

पुढे बोलतांना श्री. काटकर म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वत्र आणखी सक्रियपणे पसरविण्याची गरज आहे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला आदर्श संविधान दिले. त्यांनी दाखविलेल्या समतेचा मार्ग आपण सर्वांनी अवलंबला पाहिजे. तिच खरी आदरांजली असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी उपस्थित भाजपा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील घटी, उत्तम बोराडे, संतोष जाधव, सुरेश कांबळे, यशवंत पाटील, दिनेश वाघ, भटु सुर्यवंशी, सतोष सैंदाणे, शीतल चव्हाण, गायत्री थोरात, दगडू गवळी, हरिलाल पाटील, सजंय गवळी, मुस्ताक शेख, सुरेश आबा बोरसे, अरुण अहिरे, विलास शिरसाठ, सुरेश ठाकरे, शशीकांत सुर्यवंशी, विठ्ठल पाटील, नाना गुरव, शशिकांत चौधरी, गोपाल घटी, रवींद्र बोरसे, शकंर लोढें, कोमल पाटील, आर्जुन सकट, इदंल जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*