Type to search

मांडळला श्रमदानातून शेततळ्यांचा निर्धार

maharashtra आवर्जून वाचाच धुळे

मांडळला श्रमदानातून शेततळ्यांचा निर्धार

Share
धुळे ।  प्रतिनिधी :  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धुळे तालुक्यातील मांडळ येथे अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रमदानातून चार शेततळे करण्याचा निर्धार गावकर्‍यांनी व्यक्त केला व लागलीच कामाला सुरवात देखील केली.

सरपंच नयना पाटील, मांडळच्या परिवर्तनासाठी, गाव पाणीदार व दुष्काळमुक्त करण्यासाठी पुढाकार घेणारे डॉ. संदीप पाटील यांच्या उपस्थितीत हा संकल्प गावकर्‍यांनी केला.

मांडळ येथे 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सामुहिक बुद्धवंदना करण्यात आली. सरपंच सौ. नयना संदीप पाटील, डॉ. संदीप पाटील, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष एकनाथ गवळे, माजी सरपंच रमेश जिभाऊ गवळे, प्रा. सी. यू. पाटील, ग्रामपंचायत सदस्य रामदास सोनवणे, पोलीस पाटील भिमराव मोहिते, देवीलाल गवळे, गंजीधर गंगावणे, भावलाल गवळे, मधुकर गवळे, दामू मोहिते, विजय गवळे, अनिल गवळे, विशाल गवळे, वसंत गवळे, राहूल गवळे, दीपक गवळे, दादाभाऊ गंगावणे, मुकेश गवळे, सतीश गवळे, ज्ञानेश्वर सोनवणे, लोटन मोहिते, मोठाभाऊ गवळे, लहानू गवळे, साहेबराव सोनवणे, शिवाजी गवळे, प्रकाश मोहिते, प्रेमराज मोहिते, शरद मोहिते, एकनाथ गंगावणे, राजेंद्र निकम, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.

मांडळचा कायापालट करायचा असेल, गाव पाणीदार व दुष्काळमुक्त करायचे असेल तर एकीतून ते शक्य आहे. त्यामुळे पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत मांडळ सर्वोच्च स्थानावर राहण्यासाठी एकीचे दर्शन घडवावे लागेल. तसे मांडळच्या गावकर्‍यांनी ठाणल्याने गावात एकीचे दर्शन घडू लागले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून आंबेडकर जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात जलसंधारणाच्या कार्यातून गावाचा कायापालट करण्याचा निर्धार उपस्थित गावकर्‍यांनी केला. त्यांनी श्रमदानातून चार शेततळे करण्याचा दृढ संकल्प केला. त्यासाठी सारे गाव एक झाले आणि मनसंधारणातून जलसंधारणाचे कार्य उभे करण्यास ते अहोरात्र झटू लागले आहेत.

मांडळ गावातील निवडक सदस्यांनी पानी फाऊंडेशनतर्फे प्रशिक्षण घेतले आहे. स्पर्धेच्या आधी करावयाच्या 30 गुणांचे काम उरकून 7 एप्रिलच्या मध्यरात्री 12 वाजेपासून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थित झालेल्या श्रमदानाने या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. त्याला आंबेडकर जयंतीनिमित्त झालेल्या निर्धाराची जोड मिळाली. त्यामुळे गावात आनंद व्दीगुणीत झाला व अमाप उत्साह संचारला.

लागलीच भोकरे शिवारात श्रमदानाने शेततळे करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. श्रमदानातून तीस बाय तीस मीटर बाय तीन मीटर खोलीचे चार शेततळे करण्याचा निर्धार अंमलबजावणीत यायला सुरवात झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!