“बेटी बचाओ आणि जल है तो कल है’ चा संदेश देत डॉक्टर दापंत्य करत आहेत भारत भ्रमण

0
धुळे| प्रतिनिधी :  पुणे येथिल डॉ. विजय चौधरी (वय ५० )आणि डॉ सौ वैशाली चौधरी ( वय ४४ ) हे दांपत्य बेटी बचाओ बेटी पढाओ, स्त्री भृण हत्या, जल है तो कल है या विषयावर जनजागृती करण्यासाठी स्वखर्चाने सहा फेब्रुवारीपासुन भारत भ्रमण साठी मोटरसायकलवर निघाले आहेत.

अद्याप पर्यंत २१ हजार कि मी पर्यंत २९ राज्यांमध्ये प्रवास झाला आहे. ९मे रोजी पुणे येथे प्रवास थांबणार आहे.
डॉ चौधरी यांनी मार्गदर्शनात सांगीतले की, स्त्री भृणहत्त्या हि गंभीर समस्या आहे.

 

बंदी असतांना देखील आमच्यातील कलंकीत डॉक्टर हे घृणकृत्य करीत आहे. सापडल्यानंतर त्यांना कायद्याने शिक्षा होतेच परंतु स्त्री भृण हत्या आणि लिंग परीक्षण करणाऱ्या फक्त एका मायबापाला शिक्षा झाल्यास लिंगभेद आणि स्त्री भृण हत्याकायमस्वरूपी संपुष्टात येतील. यासाठी प्रयत्न करायला हवा.

तसेच, त्यांनी वैद्यकीय सेवा पुरवीत असलेल्या गावात ब्लड गृप कँप घेवून त्याची नोंद स्वतःकडे ठेवली आहे. आता ते स्वतःची ब्लड गृपची वेबसाईट तयार करीत आहेत जणे करून रक्त लागल्यास त्वरीत संपर्क साधुन उपलब्ध करता येईल. त्यामुळे शोधाशोध होणार नाही.

याआधी सायकलवर भ्रमंती करून एड्स जनजागृती केली आहे. डॉ . विजय चौधरी आणि डॉ सौ वैशाली चौधरी हे पुण्यात वैद्यकीय व्यवसाय करतात.

६ फेब्रुवारीपासून प्रवासास सुरुवात

डॉक्टर श्री व सौ चौधरी हे पेशाने डॉक्टर असल्याने व्यवसाय करीत असतांना आलेल्या अनुभवा वरून आजदेखील मुलांना महत्व दिल्या जात असल्याचे त्यांना अनुभवयास मिळाले त्यामुळे समाजात स्त्री भृण हत्या आणि बेटी बचाओ बेटी पढाओ बाबत जागृती करणे महत्वाचे असल्याने त्यांनी भारत भ्रमण करण्याचा निर्णय घेतला.

सहा फेब्रूवारी रोजी मोटारसायकलवर प्रवासास सुरुवात केली. तीन महिन्यांपासून प्रवासात आहेत .

२९ राज्य आणि त्यांच्या राजधान्या

पुणे, गोवा मार्गे कन्याकुमारी मार्गे दिल्ली मार्गे मध्य प्रदेश मधुन महाराष्ट्रात परतीच्या प्रवास असे एकुण २९ राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्यांमध्ये २१ हजार किमीचा प्रवास करून प्रचार आणि प्रसार करीत आहेत. रोज चारशे ते पाचशे किमीचा प्रवास करीत आहेत.

स्वखर्चाने जनजागृतीसाठी भारत भ्रमण.

२१ हजार किमीचा भारत भ्रमण करून जनजागृतीसाठी कोणाचीही मदत न घेता स्वखर्चाने प्रवास आणि रहाण्याचा खर्च करीत आहेत . अद्यापपर्यंत पाच लाखांपर्यंत खर्च झाला आहे. रोजचा पाच ते सहा हजारांपर्यंत पेट्रोल, रहाणे इतर असा प्रवास त्यांना येत आहे.

बारा तास रोज प्रवास

रोज सकाळी सात वाजता प्रवासास सुरुवात होते आणि सायंकाळी सात वाजता जिथे संध्याकाळ झाली तिथे प्रवास थांबवत आहेत. या दरम्यान शाळा महाविद्यालय ट्रेनिंग सेंटर आदी ठिकाणी जाऊन बेटी बचाओ बेटी पढाओ बद्यलजनजागृती करीत आहेत.

LEAVE A REPLY

*