Type to search

maharashtra धुळे

कुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण

Share
धुळे । धुळे ग्रामीण मतदार संघातील जनतेला विकासाचा शब्द दिला होता त्याचवेळी कुंडाणे आणि वार दरम्यान पांझरेवर पुल करण्याचेही मी वचन दिले होते आज ते पूर्ण केल्याचा आनंद आहे. मात्र राज्याच्या विधानसभेत मंजूर केलेल्या कामांचे श्रेय देशाचे संरक्षण राज्यमंत्री घेतात ही माझ्या व देशाच्या दृष्टीने खेदाची बाब असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी आज मोठ्या पुलाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सांगितले. या पुलासाठी एकूण 5 कोटी 52 लक्ष रुपये मंजुर करण्यात आले होते.

धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून धुळे तालुक्यातील कुंडाणे-वार दरम्यान पांझरा नदीवर पुल मंजूर करण्यात आला होता. या कामासाठी एकूण 5 कोटी 52 लक्ष रुपयाचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर केले होते. सदर पुलाचा आज दि.21 फेबु्रवारी रोजी आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

पुढे बोलतांना आ.कुणाल पाटील म्हणाले की, कुंडाणे वार दरम्यान पांझरा नदीवर पुल बांधून देण्याचा मी निवडणूकीत शब्द दिला होता तो शब्द आज पूर्ण केला आहे. विधासभाा अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यात या मोठ्या पुलाचा समावेश करुन घेतला होता. त्यानुसार या कामासाठी लागणारा निधीची बजेटमध्ये तरतूदही करुन घेण्यात आली. आणि गेल्या दीड वर्षाच्या काळातच हा पूल पूर्ण झाला. विधानसभेत मंजूर केलेल्या कामांचे श्रेय देशाचे संरक्षण राज्यमंत्री घेत असतात आणि अशा न केलेल्या कामांचे ते भूमीपुजन, उद्घाटन करत फिरत आहेत. खरतर ही देशाच्यादृष्टीने खेदाची बाब आहे. त्यामुळे लोकसभेत काँग्रेस पक्षाच्या उमदेवाराला निवडून आणून लोकशाहीचे शासन आणायचे असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमात डॉ.दरबारसिंग गिरासे यांनी मनोगत व्यक्त केले. आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने पूर्ण झालेल्या कुंडाणे-वार पुलामुळे हे दोन गावे जोडली गेली असून गोंदूर,निमडाळे, परिसरातील नागरीकांनाही हा पुल सोयीचा झाला आहे. या पुलासाठी एकूण 5 कोटी 52 लक्ष 88 हजार रुपये मंजुर करण्यात आले होते. त्या पुलाची लांबी 220 मीटर असून रुंदी 7.50मीटर आहे.आज झालेल्या लोकार्पण सोहळ्याला धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्यासह जि.प.सभापती मधुकर गर्दे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे, अशोक सुडके, माजी.पं.स.सदस्य शिरीष सोनवणे, कुंडाणे सरपंच दादाजी मोरे, उत्तमराव बच्छाव, मोराणे माजी सरपंच प्रविण सोनवणे, खरेदी विक्रीचे संचालक बापू खैरनार, सुनिल पाटील, किसन पाटील, गवरलाल पाटील, रत्नाताई पाटील, ताईबाई पाटील, किसन वाघ, ताईबाई वाघ, रविंद्र पाटील, हरिष भदाणे, संदिप शेलार, शिवदास शेलार उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!