Type to search

Breaking News धुळे

कनिष्ठ अभियंता परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करा

Share

धुळे – 

शासनाच्या जलसंपदा विभाग आणि मुंबई महापालिकेत कनिष्ठ अभियंता पदासाठी घेतल्या जाणार्‍या परिक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा, अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी राज्यपाल तसेच जलसंपदा विभागाच्या सचिवांकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,  महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत तसेच बृहन्मुंबई महापालिकेच्या अंतर्गत कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्यात येणार आहे. त्यात मुंबई महापालिकेच्या वतीने 243 कनिष्ठ अभियंत्यांच्या पदासाठी दि. 25 नोव्हेंबर रोजी परिक्षा घेतली जाणार आहे.

तर जलसंपदा विभागाच्या वतीने 504 कनिष्ठ अभियंत्यांच्या पदासाठी दि. 25 व 26 नोव्हेंबर रोजी परिक्षा आयोजित करण्यात आली आहे. दि. 25 नोव्हेंबर रोजी दोन्ही परिक्षा एकाच दिवशी आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबरोबरच प्रचंड नुकसान होणार आहे.

धुळे जिल्ह्यासह राज्यात अभियांत्रीकीचे शिक्षण घेऊन असंख्य विद्यार्थी गेल्या अनेक वर्षापासून शासकीय सेवेत नोकरी मिळावी म्हणून अभ्यास करीत आहेत. त्यात गोरगरीब आणि शेतकरी कुटूंबातील होतकरु विद्यार्थ्यांनी अतिशय बिकट परिस्थितीतून अभ्यास करुन शिक्षण घेतले आहे.

दरम्यान मुंबई महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामार्फत एकाच दिवशी कनिष्ठ अभियंता पदासाठी परिक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना परिक्षेस बसता येईल.

परिणामी विद्यार्थ्यांची नोकरी मिळण्याबाबतची एक संधी जाऊन प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे या दोनही परीक्षेंच्या वेगवेगळ्या तारखा ठेवून वेळापत्रकात बदल करण्याबाबतचे आदेश संबंधितांना व्हावेत, अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!