कृषी महोत्सवाची महिलांनी घेतली माहिती

0
धुळे । येथील कृषी महोत्सवाची निमगुळ ता. धुळे येथील महिलांनी पाहणी करुन माहिती जाणून घेतली.

कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित धान्य महोत्सव, शेतकरी व महिला बचत गटांच्या उत्पादित शेतमाल व सेंद्रिय शेतमाल विक्री व प्रदर्शन अर्थात जिल्हा कृषी महोत्सवाचे दि. 7 फेब्रुवारीपासून आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा समारोप 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

कृषी महोत्सव पाहण्यासाठी कृषी विभागाने महिलांनाही आमंत्रित करावा अशी संकल्पना निमगूळ येथील शेतकरी दिलीप खिवसरा त्यांनी कृषी खात्याकडे मांडली. त्या संकल्पनेला कृषी विभागाने हिरवा कंदिल दिला. त्यानंतर खिवसरा यांनी 20-25 महिलांना प्रदर्शन पाहण्यासाठी आणलेे.

महिलांनी महोत्सवातील प्रत्येक स्टॉलची पाहणी करून सखोल माहिती घेतली. त्यात त्यांनी मुख्यमंत्री सौर योजना, जैवीक खताचे महत्व, फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, पाणी व स्वच्छतेचे संदेश, डायरिया होण्याची कारणे, पर्यावरण पूरक व कमी खर्चाचे शोषखड्याचे शौचालय, जैविक खते, नविन बायो कॅप्सुलच्या रुपात, मत्स्यव्यवसाय, माती परिक्षण या माहितीचा समावेश आहे.

प्रथमच महिलांनी एकत्रित येवून माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, पी.एम. सोनवणे, वारुडे, चौधरी, कृषी सहाय्यक वाघ आदि उपस्थित होते, तसेच कृषी खात्यातील महिलांच्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा यावेळी महिलांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*