खुडाणे गाव ‘तंटामुक्ती’ पुरस्काराचे मानकरी

0
निजामपूर । दि.27 । वार्ताहर-साकी तालुक्यातील माळमाथा परिसरात निजामपुर पोलीस स्टेशन अंतर्गत 4 गावे तंटामुक्त झाली आहेत.यात खुड़ाणे, ऐचाळे. कढरे, छावड़ी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या गावांना महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार देवुन सनमानित करण्यात आले आहे.
गावाचा विकास कामासाठी शासनाने खुड़ाणे गावाला चार लाख रुपयांचे धनादेश अपर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे यांच्याहस्ते निजामपुर येथे देण्यात आले.

दि.28 ऑगष्ट 2015 रोजी सौ.कल्पना माळी यांनी खुड़ाणे गावाची सता मिळविली. त्या गावाच्या सरपंच तर नामदेव गवळे उपसरपंच झाले.

सदस्य म्हणून अशोक खलाणे, कनहैयालाल काळे, गंगाधर भदाणे, चैत्राम सोनवणे, मुलकन वाघ, महारुमाळचे महेन्द्र हेमाड़े, शालीग्राम देवरे, राजेन्द्र खैरनार, माजी सरपंच धनराज माळी, ग्रामविकासी अधिकारी, एन. ड़ी. मोहिते हे निवडून आले आणि कामाला सुरूवात झाली.

कल्पना माळी यांनी खुड़ाणे गांव आदर्श कसे करता येईल, यासाठी गावात ग्रामसभा बोलावून विकास कामांवर चर्चा केली. शासनाला पाठपुरावा करुन कामांना सुरुवात केली.

यात खुड़ाणे गावांच्या अमरधामची दुरुस्ती करून बोअरवेल केला. झाड़े लावली. गावात सिमेंट रस्ते केले.गावालील ग़टार साफ केली.

गावात लहान मुलांना शिक्षणासाठी ड़िजीटल शाळा केली. दोन बोअरवेल करून दरवर्षी डोक्यावर हंडा धरुन होणारी महिलांची भटकंती थांबवली.

गावात भुयारी गटारी करुन मुख्य चौकात हॉयमॅक्स लॅम्प लावले. गावात व्यसनाचे प्रमाण वाढत असल्यामूळे गावात संपूर्ण दारुबंदीचा ठराव करून लोकांचा व महिलांच्या मदतीने गावात दारुबंदी केली.

पावसाळा सुरू होत असल्यामुळे गावातील तरुणांना एकत्र करून गावात व परिसर विविध प्रकारचे वुक्षलागवड केली. गावात प्रदुषणमुक्त होळी केली.

गावात स्वच्छता अभियान राबविले.गरिब लोकांना शासनाची योजना मिळवुन दिली. अशी अनेक कामे केली आहेत.

दि.3 ऑक्टोबर 2017 खुड़ाणे परिसरातील अतिवुष्टीमुळे गावाजवळील घटबारी धरण फुटले होते. गावातील व परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान झाले होते.

वेळोवेळी दुरूस्तीसाठी शासन, प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मंजुरीसाठी 56 लाखांचा बजेट होता. त्यासाठी वेळ लागणार होता. पावसाळा आल्याने पाणी थांबविणे आवश्यक होते.

यासाठी विशेष ग्रामसभा बोलावुन लोकसहभागातुन धरणाचे काम करण्याचे ठरले. यात 350 ग्रामस्थ, महिला लहान मुले व जेष्ठ नागरीकांना एकत्र केले. गावकर्‍यांच्या मदतीने लोकसहभागातुन धरणाचे काम केले.

यात सामाजिक कार्यकते व प्रशासनाचे अधिकारी व राजकीय नेते मंड़ळीने आर्थिक मदतीने काम केले. घटबारी धोरणाचे पाणी खुड़ाणेसह परिसरातील आठ ते दहा गावाचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

लोकसहभागातुन धरणाचे काम पुर्ण केले. धरणात पाणीसाठा होण्यास झाली आहे.

या कल्पनेतुन आपले खुड़ाणे गाव तंटामुक्त होण्यासाठी गावकर्‍यांची मदत घेतली. यात जेष्ठ नागरीक विश्राम खैरनार, पांडुरंग महाले, संतोष खैरनार, दिलीप गवळे, मधुकर वाघ, विनोद गवळे, विलास खैरनार, भरत खैरनार, पोपट बाविस्कर व महिला व तरूणाच्या मदतीने वेळावेळी सभा घेवून तंटामुक्त करण्याचे ठरविले.

यासाठी शासनाला प्रस्ताव व पत्रव्यवहार करण्याची जबाबदारी तरूण पराग गवळे यांना देण्यात आली. खुड़ाणे गांव तंटामुक्त होण्यासाठी विशेष सहकार्य व मदत निजामपुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, बीट हवालदार रायते, लोहार, याचे मिळाले.

जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे यांच्याहस्ते चार लाखाचा धनादेश खुड़ाणे ग्रामस्थांना देण्यात आला. सौ. कल्पना माळी या खुड़ाणे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेन्द्र राजाराम माळी यांच्या पत्नी आहेत.

केलेल्या कामाची पावती देत आहे. माझ्या कारकीर्दीत प्रथम पुरस्कार मिळाला आहे. यामुळे शासनाकड़ुन पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करून हिरवे बाजार गांवाप्रमाणे विकासकामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*