Type to search

धुळे

तापी जलवाहिनीला तीन ठिकाणी भगदाड

Share

कापडणे । तीव्र पाणीटंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असतांना तापीच्या जलवाहिनीतुन आज(दि.19) लाखों लिटर पाण्याची नासाडी झाली. धुळे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या जलवाहिनीला तब्बल तीन ठिकाणी गळती लागल्याने लाखों लिटर पाण्याची नासाडी होतांना पाहुन उपस्थितांतुन संताप व्यक्त होत होता. यातील देवभाने फाट्याजवळील गळती ही एअर व्हॉल्व्ह मधून असल्याने मध्यरात्रीपासूनच जोरात पाण्याचे फवारे उडत होते. या पाण्याचा अपव्ययावर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

मुंबई आग्रा महामार्गालगतच्या तापी जलवाहिणीला, देवभाने फाट्याजवळील श्री. सप्तशृंगी देवी प्रवेशद्वाराजवळ मध्यरात्रीपासुन मोठी गळती होती. यात एअर व्हॉल्वला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली. मध्यरात्रीपासूनच असलेली ही गळती आज दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु होती.

यावेळी एअर व्हॉल्व मधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचे फवारे बाहेर उडत होते. परिणामी हजारो लिटर पाणी वाया जात होते हे पाणी थेट महामार्गालगत वाहत होते. अतिशय जोरात निघणारे पाणी थेट महामार्गावर उडत होते. म्हणून काहीं वाहन चालकांनी याठिकाणी आपली वाहने धुण्यासाठी उभी केली होती.

देवभाने फाट्याबरोबरच बाभळे व गोराणे फाट्यालगत सुरू असलेल्या या गळतीकडे मात्र तापी जलवाहिनी विभागाने बराच काळ दुर्लक्ष केले. मध्यरात्रीपासून वाहणारे पाणी हे दुपारी बारा वाजेपर्यंत तसेच वाहत होते. तसेच बाभळे फाट्यावर तसेच गोराणे फाट्यालगत पडलेल्या मोठ्या भगदाडामुळेही हिच परिस्थिती होती. या तीन्ही गळतीतुन यावेळी लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली.

तापी जलवाहिणी अतिशय जीर्ण असल्याने तापी जलवाहिनीला गळती किंवा फुटण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. मात्र याकडे नेहमी दुर्लंक्ष केले जाते. जलवाहिनी फुटल्यानंतर ग्रामस्थांनी माहिती दिल्यावर देखील संबंधित तात्काळ येऊन गळती थांबवित नाहीत, असा आरोप ग्रामस्थांमधून नेहमी होतो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!