Type to search

धुळे

कापडण्याच्या तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू

Share

कापडणे । येथील विशाल उत्तम मोरे (माळी) (वय 22) या तरुणाचा कोल्हापूर येथे आज दि.15 रोजी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण मात्र समजु शकले नाही. गेल्या महिनाभरात येथील विविध भागांमध्ये अनेक दु:खद घटना घडल्याने गावात एक अनामिक भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेने गावावर शोककळा पसरली असुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विशाल उत्तम माळी (वय 22) हा तरुण कोल्हापूर येथे आपल्या बहिणीकडे शिक्षणासाठी राहत होता. लहानपणापासूनच विशाल हा आपल्या मोठ्या बहिणीकडेच वास्तव्यास होता. सध्या अभियांत्रिकेचे शिक्षण घेत होता, अभ्यास चांगला व्हावा म्हणून तो कोल्हापूर येथील मोरे वाडी परीसरातील आर.के.नगर मध्ये रूम घेऊन राहत होता.

दि.12 रोजी लग्नानिमित कापडणे येथे विशाल घरी आला होता. पुणे येथे मुलाखतीला जायचे म्हणून दि.13 रोजी विशाल कापडण्याहुन पुणे येथे गेला होता. त्याठिकाणी मुलाखतीचे काम आटोपून विशाल माळी हा पुन्हा कोल्हापूर येथील आपल्या रूम वरती आला. दि.14 रोजी रात्री कापडणे येथून वडिलांनी विशाल यांची विचारपूस देखील केली. रात्री साडे दहा वाजेपर्यंत विशाल व त्याच्या वडिलांचे बोलणे झाले. यात विशालने मुलाखत चांगली झाल्याचाही निरोप आनंदाने सांगितला. पण दुर्देवाने हे बोलणे शेवटचे ठरले.

आज (दि.15) सकाळी नेहमीप्रमाणे कापडणे येथून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता विशालने त्यास प्रतिसाद दिला नाही. सहज चौकशी म्हणुन बाजूला असलेल्या महिलेच्या नंबरवर संपर्क साधत कुटुंबियांनी विशाल माळीची चौकशी केली. तुझ्या घरचे फोन करताहेत, हे सांगण्यासाठी संबंधित महिलेने वरच्या मजल्यावरील रूमचा दरवाजा ठोठावला असता त्यांनाही काहीही प्रतिसाद मिळाला नाही. अजुन प्रयत्न करुनही प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यावर परिसरातील लोकांनी दरवाजा तोडला असता, विशाल हा रुममध्ये मृतावस्थेत आढळून आला. मृत्यूचे कारण मात्र समजु शकले नाही.

विशाल हा घरातील अतिशय हुशार आणि हरहुन्नरी मुलगा होता. विशालचा मोठा भाऊ चेतन माळी हा शेती काम करतो. तर वडील उत्तम बुधाजी मोरे हे निवृत बसचालक आहेत.

विशालने यावर्षीच बी.ई बायोटेक्नालॉजी पूर्ण केले होते. तो अतिशय हुशार व मनमिळावू विद्यार्थ्यी होता. त्याला बंगळूर येथील कंपनीतही नोकरीचा कॉल देखील आला होता. मात्र विशाल याला महाराष्ट्रातच नोकरी करायची असल्याने त्याठिकाणी जाणे त्याने टाळल्याचे ठरवले होते व पुण्यास एक कंपनीत मुलाखत दिली होती.

विशालची अंत्ययात्रा उद्या दि.16 सकाळी 9 वाजता येथील राहत्या घरापासुन काढण्यात येणार आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!