Type to search

धुळे

विजेचा धक्का लागल्याने लाईनमनचा मृत्यू

Share

कापडणे । येथील रहिवाशी व सायखेडा(ता.निफाड) येथे विजवितरण कंपनीत लाईनमन म्हणुन कार्यरत असलेले गणेश दगाजी पाटील (वय 27) याचा आज(दि.13) विजेचा धक्का लागुन मृत्यू झाला. पिंपळगाव शिवारातील शेतांमध्ये 11 केव्हीच्या मुख्य विद्युत वाहिनीवर काम करत असतांना सायंकाळी 6:30 वाजता अचानक विजपुरवठा सुरु झाल्याने हा अपघाती मृत्यू झाला. गणेश याटील हा सध्या सायखेडा कार्यालयातंर्गत येणार्या बेरवाडी(ता.निफाड) या गावात लाईनमन म्हणून कार्यरत होते.

पिंपळगाव, सायखेडा आदी भागातील 11 केव्हीवरील विद्युत प्रवाह गेल्या तीन दिवसापासून पूर्णतः बंद होता. वादळामुळे काही इलेक्ट्रिक पोलही पडलेले होते, त्यांना उभे करण्याचे कामही सुरू होते तर काही लाईनमन इलेक्ट्रिक पोल वरती काम करीत होते. वीज प्रवाह खंडित करून लाईनमन काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्यामुळे गणेश पाटील यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

गणेश पाटील इलेक्ट्रिक पोल वरती काम करत असताना अचानक लाईट आलीच कशी? असा सवाल उभा राहत असुन वीज महावितरणचे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे गणेश पाटील याचा अपघाती मृत्यू ओढवला आहे, असा आरोप गणेश कुटुंबियांनी केला आहे. गणेश पाटील यांच्या कुटुंबियांना भरीव भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

मयत गणेश पाटील हा येथील दगाजी रतन पाटील व शालू पाटील यांचा मुलगा तर येथील वीज महावितरण कंपनीच्या सबस्टेशन मध्ये लाईनमन म्हणून नोकरी करणारे चेतन दगाजी पाटील यांचे ते भाऊ होत. मयत गणेश दगाजी पाटील यांची अंत्ययात्रा दि. 14 जून रोजी दुपारी त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. गणेश पाटील यांचे दीड वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न समारंभ झाले. त्याच्या पश्चात पत्नी रोहिणी, नऊ महिन्याचा मुलगा, आई,वडील, भाऊ, काका असा परिवार आहे. गणेश पाटीलचा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने कापडणे गावात हळहळ व्यक्त होत आहे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!