न्याहळोदला पाणी फिल्टर प्लॅन जाळला

0
कापडणे । दि. 20 । प्रतिनिधी-तालुक्यातील न्याहाळोद येथे वैयक्तिक वादातून समाधान माळी व रामकृष्ण माळी यांचा पाणी पिल्टर प्लान जाळून टाकल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली.
यात बारा लाखाचे नुकसान झाले आहेे. सोनगीर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्याहाळोद येथील साहेबराव सहादु माळी यांचा मुलगा समाधान माळी व त्याचा मित्र रामकृष्ण नामदेव माळी या दोघांचा मिळून गावात पाणी फिल्टर प्लॉन आहे
गावातील जितेंद्र सुखलाल कोळी यांच्याशी वैक्तिक वादातून समाधान यांचे भांडण झाले याप्रकरणात समाधानला जितेंद्र सुखलाल कोळी व त्याच्या सहकार्‍यांनी रामकृष्ण माळी यास बेदम मारहाण केली यावेळी संशयित आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी दुसर्‍या दिवशी पहाटेच्या सुमारास सहकार्‍यांसह जाऊन पिल्टर प्लान जाळून टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

यावेळी धुळे अग्निशमन दलाची गाडी वेळेवर आल्याने पिल्टर प्लान ला लागून असलेले घरांची नुकसान टळली मात्र समाधान माळी व रामकृष्ण माळी यांचा पिल्टर प्लान ची पूर्णपणे राखरांगोळी झाली आहे.

यात वाटर फिल्टर प्लॅनची मशिनरी व इतर साहित्य जळून नष्ट झाले. तसेच 2055 रुपये किंमतीचे प्लॅस्टीकचे रिकामे ड्रम, 30 हजार रुपये रोख, 50 हजार रुपये किंमतीचे शेतीचे अवजारे, विद्युत पंप, जनरेटर आणि घराच्या छताच्या लाकडी दांड्या व पत्रे सुमारे एक लाख रुपये किंमतीचे असा बारा लाख 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे.

याबाबत सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जितेंद्र कोळी,विलास कोळी,शरद कोळी,रंभाबाई सुखलाल कोळी, भास्कर कोळी यांची तक्रारीत नावे आहेत यांच्यावर 143, 147, 148, 148, 452,323,504,506,427 प्रमाणे सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पिल्टर प्लान जाळून टाकल्याने जितेंद्र सुखलाल कोळी यांच्यावर कलम 436लावण्यात आली आह

पुढील तपास सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली एस.बी.जाधव करीत आहेत

 

LEAVE A REPLY

*